Business Idea In Marathi : 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणारे टॉपचे 5 व्यवसाय, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea In Marathi : जर तुम्हीही व्यवसाय सुरू करून स्वतःचे साम्राज्य तयार करण्याचे स्वप्न पाहत असाल, व्यावसायिक होण्याची तुमच्या मनात जिद्द असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी आहे. खरंतर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कंपनीत काम करून आता तरुण उबगले आहेत. यामुळे कंपनीच्या या रुटीन कामाला कंटाळून अलीकडे छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी व्यवसाय म्हटला की इन्व्हेस्टमेंट आलीच आणि इन्व्हेस्टमेंट अभावी अनेकांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही.

अनेकांना असे वाटते की कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला लाखो रुपयांचे भांडवल लागते. मात्र आज आम्ही अशा काही बिझनेस आयडियाबाबत आपणास सांगणार आहोत जे बिजनेस फक्त दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात.

कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र आज आपण फक्त 10 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू होणारे पाच व्यवसाय कोणते आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टिफिन सर्विसेस : या यादीत पहिला व्यवसाय आहे टिफिन सर्विसेस. खरंतर टिफिन सर्विसेसचा हा बिजनेस काही नवा नाही, फार पूर्वीपासून अनेक लोक आपल्या भागात टिफिन सर्विसेस चा बिजनेस करून चांगली कमाई करत आहे. जर तुम्ही उत्कृष्ट स्वयंपाकी असाल तर हा बिजनेस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्हाला सुरुवातीला खूपच नगण्य भांडवल गुंतवावे लागते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणताच गाळा भाड्याने घ्यावा लागत नाही किंवा दुकानाची सजावट करावी लागत नाही. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून किंवा जिथे तुम्ही राहतात त्या खोलीतून सुरू करू शकता. जर तुम्हाला कमी इन्वेस्टमेंट मध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल आणि चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर हा व्यवसाय एक फायदेशीर पर्याय ठरणार आहे. हा व्यवसाय महिलांसाठी अधिक पूरक ठरणार आहे परंतु पुरुष देखील चांगले स्वयंपाकी असतील तर या व्यवसायात आपला जम बसवू शकतात.

यूट्यूब चैनल : जर तुम्हाला नोकरी करायची नसेल आणि व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर यूट्यूब चैनल सुरू करूनही तुम्ही चांगले उत्पन्न कमवू शकणार आहात. यूट्यूब चैनल सुरू करण्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत. मात्र youtube वर तुम्हाला कंटेंट, व्हिडिओज तयार करावे लागतील. यासाठी तुम्हाला काही साधनसामग्री खरेदी करावी लागेल. यासाठी तुम्हाला एक छोटासा स्टुडिओ तयार करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाबाबत यावर व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही टेक्नॉलॉजी विषयी, कुकिंग विषयी, फूड विषयी, पर्यटन स्थळांबाबतचे व्हिडिओ बनवून युट्युब वर अपलोड करू शकता.

लोणचे बनवण्याचा व्यवसाय : हा काही नवा व्यवसाय नाही लोणचे बनवणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत. मात्र काही लोकांना घरचे लोणचे खूपच आवडते. यामुळे जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने घरगुती लोणचे तयार करून ते तुमच्या रीजनल भागात सेल केले तर हा व्यवसाय देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. विशेष म्हणजे लोणचे बनवण्याच्या या व्यवसायासाठी तुम्हाला खूपच कमी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. फक्त तुम्ही जे लोणचे बनवणार आहात ते चांगल्या क्वालिटीचे आणि घरगुती लोणचे बनवा आणि शक्य असल्यास तुमच्या भागात अधिकाधिक लोकांना हे लोणचे विकण्याचा प्रयत्न करा. एकदा की तुमचा सेल वाढू लागला मग तुम्ही या लोणचे बनवण्याच्या व्यवसायाचे मोठ्या ब्रँड मध्ये रूपांतर करू शकता.

मेहंदीचा व्यवसाय : जर तुम्ही उत्कृष्ट मेहंदी काढत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अलीकडे अनेक मेहंदी काढणारे आर्टिस्ट युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चांगली कमाई करत आहेत. म्हणजेच जर तुम्ही उत्कृष्ट मेहंदी काढत असाल तर लग्नांमध्ये नवरी, नवरदेव, कलोरी यांना मेंदी काढून कमाई करू शकतात तसेच यांचे व्हिडिओ बनवून youtube सारख्या प्लॅटफॉर्म वरून देखील तुम्हाला अतिरिक्त कमाई करता येणार आहे. विशेष म्हणजे हा देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फारच भांडवल लागणार नाही. अलीकडे पुरुष देखील उत्कृष्ट मेंहंदी काढतात त्यामुळे पुरुषांसाठी देखील हा व्यवसाय फायदेशीरच राहणार आहे. तसेच हा व्यवसाय तुम्ही एकट्याने सुरू करू शकता किंवा तुमच्या सोबत एक टीम घेऊन तुम्ही या व्यवसायात उतरू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कुठे गाळा घ्यावा लागणार नाही, काही सजावट करावी लागणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त नेटवर्किंगच्या माध्यमातून हा व्यवसाय मोठा करू शकता. यासाठी देखील फक्त दहा हजाराच्या आसपास तुम्हाला भांडवल लागेल.

टी स्टॉल : गेल्या काही वर्षांमध्ये चहाचा स्टॉल हा एक यशस्वी बिजनेस ठरला आहे. पूर्वी चहाची टपरी लावून चहा विकणाऱ्या तरुणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूपच वेगळा होता. पण जेव्हापासून एमबीए चायवाला, ग्रॅज्युएट चायवाला, चाय सुट्टा बार यांसारख्या बिजनेस मॉडेल ने यश संपादित केले आहे तेव्हापासून या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आता चहाची टपरी चालवणाऱ्याला देखील उद्योजक असल्याची वागणूक दिली जात आहे. यामुळे जर तुम्हालाही छोट्यातून मोठ साम्राज्य तयार करायच असेल तर तुम्ही चहाची टपरी सुरू करून तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करू शकता आणि तुम्ही देखील एमबीए चायवाला, ग्रॅज्युएट चायवाला यांसारखा स्वतःचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारू शकता. यासाठी तुम्हाला सुरुवातीला दहा हजारापर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते.

Leave a Comment