मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार नवीन वेतन आयोग, शिंदे सरकारने गठीत केली समिती, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Pay Commission : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे.

खरंतर सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू करण्यात आला आहे. अर्थातच राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 2026 पर्यंत नवीन वेतन आयोग लागू होऊ शकतो.

याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही परंतु दर दहा वर्षांनी वेतन आयोग सुधारित करण्याचे प्रावधान असल्याने 2026 मध्ये नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असा अंदाज आहे.

तूर्तास मात्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणार असे चित्र तयार होत आहे. सध्या स्थितीला त्यांना सहावा वेतन आयोग लागू आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मागणी जोर धरत आहे.

एक रकमीं वेतन वाढीनंतर जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तयार झालेली तफावत दूर केली पाहिजे तसेच त्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे यासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आंदोलनाचा बडगा उगारण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर सरकारने आता या मागण्यांबाबत त्रिसदस्य समितीची स्थापना केली आहे. ही समिती आता एसटी कामगारांच्या संघटनांशी त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर मग समिती आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.

या समितीत राज्याचे अपर मुख्य सचिव, परिवहनचे प्रधान सचिव आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या समितीला अवघ्या दोन महिन्याच्या काळात आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द करायचा आहे. यामुळे दिलेल्या वेळेत समिती आपला अहवाल शासनाकडे सादर करते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment