दिवाळीच्या काळात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, होणार 2 लाखाची कमाई ! खरेदी करावे लागणार फक्त एक मशीन, वाचा डिटेल्स 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : अलीकडे देशात व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळत आहे. देशात रोजच वेगवेगळे स्टार्टअप सुरू होऊ लागले आहेत. यामधील काही स्टार्टअप यशस्वी होतात तर काही स्टार्टअप फेल होतात. कॉम्पिटिशनमुळे अनेक स्टार्टअप चांगले चालत नाहीत. यामुळे तरुणांना व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र आपला व्यवसाय चालणार की नाही, व्यवसायातून चांगली कमाई होणार की नाही या शंकांमुळे ते व्यवसाय सुरू करू शकत नाही.

इच्छा असतानाही व्यवसाय सुरू करण्यात त्यांना अडचण येत आहे. दरम्यान आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण अशा एका बिजनेस बाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये कॉम्पिटिशन खूपच कमी राहणार आहे. यामुळे हा व्यवसाय फेल ठरणार नाही. विशेष म्हणजे या व्यवसायाला बाजारात बारा महिने मागणी राहते. म्हणजेच हा व्यवसाय बारा महिने चालू शकतो. यामुळे  या व्यवसायातून 12 महिने कमाई होत राहणार आहे.

कोणता आहे हा व्यवसाय

देशात कोरोना काळापासून लाखो स्टार्टअप सुरू झाले आहेत. छोट्या-मोठ्या स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील अनेक स्टार्टअप यशस्वी देखील तयार झाले आहेत. काही स्टार्टअप यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत तर काही स्टार्टअप दुर्दैवाने मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे फेल ठरले आहेत. पण जर कमी कॉम्पिटिशन असलेले व्यवसाय सुरू केले तर व्यवसायात ग्रोथ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आज आपण कमी कॉम्पिटिशन असणाऱ्या एका व्यवसायाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण जॅम, जेंली आणि मुरब्बा बनवण्याच्या व्यवसायाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर जॅम, जेंली आणि मुरब्बा हे फळांपासून बनवलेले प्रॉडक्ट बाजारात नियमित मागणीमध्ये असतात. सणासुदीच्या काळात याच्या मागणीत आणखी भर पडते. दिवाळीमध्ये देखील जॅम, जेंली आणि मुरब्बा बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी मध्ये राहतात. त्यामुळे हा व्यवसाय दिवाळीच्या काळात सुरू केला तर तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यातच चांगली कमाई होऊ शकते.

किती गुंतवणूक करावी लागेल

या व्यवसायाबाबत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये या व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागू शकते याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. यानुसार जॅम, जेली आणि मुरब्बा बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात थोडीशी अधिक गुंतवणूक करावी लागू शकते.

सुमारे 8 लाख रुपयात हा व्यवसाय सुरू होऊ शकतो असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरंतर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक शेड तयार करावे लागणार आहे. एक हजार चौरस फुट जागेवर एक शेड बांधावे लागेल. यासाठी जवळपास दोन लाखांची गुंतवणूक लागू शकते. या व्यवसायासाठी काही मशीन लागतील.

मशीन खरेदी करण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये लागतील असा अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे. याशिवाय सुमारे दीड लाख रुपयांचे खेळते भांडवल सुद्धा लागेल. एकंदरीत या व्यवसायासाठी 8 लाखापर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. पण जर तुमच्याकडे एवढे भांडवल नसेल तर तुम्ही या व्यवसायासाठी कर्ज काढू शकता.

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते. याशिवाय तुम्हाला बँकेच्या माध्यमातून देखील व्यवसायासाठी लोन मिळू शकणार आहे. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज लागेल सोबतच तुम्हाला या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागणार आहे. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकणार आहे.

किती कमाई होऊ शकते

या व्यवसायासाठी तुम्हाला कच्चे मटेरियल म्हणून फळांची गरज भासणार आहे. तुम्ही हे फळे बाजारातून खरेदी करू शकणार आहात. जर तुम्ही शेतकऱ्यांकडून या फळांची खरेदी केली तर तुम्हाला स्वस्त दरात फळे उपलब्ध होऊ शकतात. या व्यवसायात तुम्ही आठ लाखाची गुंतवणूक करून एका वर्षात 231 क्विंटल पर्यंतचे जाम, जेली आणि मुरब्बा तयार करू शकणार आहात.

यासाठी तुम्हाला 2200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खर्च करावा लागणार आहे. म्हणजे जवळपास 5 लाख रुपये खर्च करून तुम्ही 231 क्विंटल जॅम, जेंली आणि मुरब्बा तयार करू शकतात. विशेष म्हणजे याच्या विक्रीतून 7 लाख 10 हजारापर्यंतची कमाई होण्याची शक्यता आहे. म्हणजे या व्यवसायातून दोन लाखापर्यंतची निव्वळ कमाई एका वर्षातून होऊ शकणार आहे.

Leave a Comment