महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या मार्गावर धावणार, कसा असेल रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : येत्या दोन दिवसात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरामध्ये कामानिमित्त गेलेले नागरिक आता दिवाळीचा सण सेलिब्रेट करण्यासाठी गावाकडे परतू लागले आहेत. यामुळे रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढली आहे.

रेल्वे प्रवाशांची ही गर्दी पाहता आता भारतीय रेल्वेकडून विविध रेल्वे मार्गांवर काही उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळू लागला आहे. खरंतर, देशातील रेल्वेचे नेटवर्क हे खूपच मोठे नेटवर्क आहे.

देशातील एखादाच असा परिसर असेल जिथे रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाहीये. आपल्या देशातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शहर रेल्वे मार्गाने कनेक्ट आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यातून कुठेही प्रवास करायचा असेल तर रेल्वेला पहिल्यांदा पसंती दाखवली जाते.

विशेष बाब अशी की, रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी नेहमीच रेल्वेला पसंती दाखवतात. दरम्यान दिवाळीच्या या आनंददायी पर्वात महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आठ नोव्हेंबर पासून ही एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून दिवाळी सण संसदेपर्यंत ही गाडी सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान सुरक्षित आणि किफायतशीर होणार आहे.

कोणत्या मार्गावर धावणार सुपरफास्ट ट्रेन ?

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी आणि पुढील महिन्यातील नाताळ सणाच्या निमित्ताने मध्ये रेल्वेच्या माध्यमातून सुरत ते ब्रह्मपूर दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही एक साप्ताहिक गाडी राहणार आहे. ही गाडी अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर चालवली जाणार आहे. सुरत ते ब्रह्मपुर अशा आठ फेऱ्या आणि ब्रह्मपुर ते सुरत अशा आठ फेऱ्या अशा एकूण 16 फेऱ्या होणार आहेत.

कसं असणार वेळापत्रक ?

हाती आलेल्या माहितीनुसार, सूरत-ब्रह्मपुर विशेष एक्स्प्रेस गाडी ८ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत दर बुधवारी चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत बुधवारी सुरत स्थानकावरून १४:२० वाजता रवाना होणार आहे आणि शुक्रवारी ब्रह्मपूर येथे ०१:१५ वाजता पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच ब्रह्मपुर-सुरत एक्स्प्रेस ही गाडी १० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी सुटणार आहे. ब्रह्मपुर स्थानकावरून वरून प्रत्येक शुक्रवारी ०३:३० वाजता सुटणार आणि सुरत येथे शनिवारी १३:४५ वाजता पोहचणार अशी माहिती समोर आली आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

Leave a Comment