Pan Card विना सिबिल स्कोर कसा चेक करायचा ? पहा संपूर्ण प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cibil Score Check Without Pan Card : भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन अतिशय महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत. या शासकीय कागदपत्रांविना भारतात कोणतेच काम होऊ शकत नाही. पॅन कार्ड बाबत बोलायचं झालं तर कोणत्याही वित्तीय कामासाठी पॅन कार्ड लागतेच. बँकेत खाते खोलण्यासाठी, आयटीआर भरण्यासाठी, केवायसी अशा विविध आर्थिक कामांसाठी पॅन कार्डचा वापर होतो.

एवढेच काय सिबिल स्कोर चेक करण्यासाठी देखील पॅन कार्ड लागते. तुम्हाला सिबिल स्कोर विषयी तर माहिती असेलच. बँका कोणत्याही कर्ज देण्यापूर्वी आधी त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चेक करतात. सिबिल स्कोर हा एक महत्त्वाचा तीन अंकी आकडा असतो. सिबिल स्कोर 300 ते 900 दरम्यानचा असतो.

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) द्वारे प्रदान केलेला हा स्कोअर हा एक मूलभूत घटक आहे जो बँका आणि इतर वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीची कर्ज पात्रता ओळखण्यासाठी वापरतात. ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना सहजतेने कर्ज मंजूर होते आणि कमी व्याजदर आकारले जाते.

सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असला तर चांगला समजला जातो. मात्र यापेक्षा कमी सिबिल स्कोर असला तर कर्जासाठी अधिक व्याजदर आकारले जाते. कमी सिबिल स्कोर असल्यास काही बँका कर्ज नाकारतात.

यामुळे सिबिल स्कोर मेंटेन ठेवणे आवश्यक असते. दरम्यान आज आपण पॅन कार्ड विना सिबिल स्कोर कसा चेक करायचा याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर सिबिल स्कोर चेक करण्यासाठी पॅन कार्ड लागते.

मात्र आता आपण पॅन कार्ड नसल्यास सिबिल कसा चेक करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत. तथापि, जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल, तर तुमचा सिबिल स्कोअर मिळवण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. तरीही आज आपण पॅन कार्ड नसल्यास सिबिल स्कोर कसे चेक करायचे हे पाहणार आहोत.

पॅन कार्ड नसल्यास सिबिल स्कोर चेक कसा करायचा ?

यासाठी तुम्हाला CIBIL च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. वेबसाईटवर भेट दिल्यानंतर वैयक्तिक CIBIL स्कोअर विभाग पहा, जिथे तुम्ही तुमचा CIBIL स्कोर मिळवा हा पर्याय निवडून प्रक्रिया सुरू करू शकता. येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती योग्यरित्या भरण्यास सांगितले जाईल.

जर तुमच्याकडे पॅनकार्ड उपलब्ध नसल्यास, तुमच्याकडे पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनकार्ड यासारखे इतर ओळखपत्र प्रदान करण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. तुम्ही जें कागदपत्र निवडलेले असेल त्या आयडीचा क्रमांक फक्त प्रविष्ट करावा लागणार आहे. यानंतर तुमची जन्मतारीख, पिन कोड टाका आणि ड्रॉपडाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा.

तुम्हाला मोबाईल नंबर देखील विचारला जाईल, त्यानंतर तुम्ही अटींना सहमती द्यावी आणि पुढे जायचे आहे. तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. OTP एंटर केल्यानंतर तुमच्याकडे डिव्हाइसला तुमच्या खात्याशी लिंक करण्याचा पर्याय असेल.

तुम्ही तुमच्या पसंतीनुसार होय किंवा नाही निवडू शकता. यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला पुन्हा एकदा योग्यतेची पडताळणी करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचा CIBIL स्कोर पाहण्यासाठी डॅशबोर्डवर जा आणि तिथून संपूर्ण माहिती पाहू शकता. म्हणजेच तुम्ही पॅन कार्ड नसले तरी देखील सिबिल स्कोर चेक करू शकता.

Leave a Comment