सर्वसामान्य नागरिक घरात किती ग्रॅम सोने ठेवू शकतात ? तुमच्याही घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने आहे का ? आयकराचे नियम जाणून घ्या नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Limit at Home : भारतात फार पूर्वीपासून सोन्याला महत्त्व आहे. हिंदू सनातन धर्मात शुभप्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते. लग्नकार्य, सणासुदीच्या दिवसांमध्ये हिंदू सनातना धर्मात सोन्याची खरेदी करणे पवित्र मानतात. याशिवाय सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील आपल्या देशात खूपच अधिक आहे.

फिक्स डिपॉझिट पेक्षा सोन्यात गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. विशेषता महिला नेहमीच सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. महिलांना सोन्याचे वेगवेगळे आभूषण घालणे विशेष आवडते.

पण तुम्हाला माहित आहे का की, घरात किती सोने ठेवले पाहिजे याबाबत आयकर विभागाने काही नियम तयार केले आहेत. या मर्यादेपेक्षा जर जास्त घरात सोने आढळले तर सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आता आपण तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता ? याबाबत आता आपण आयकर विभागाचे नियम काय आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

तुम्ही स्वतःजवळ किती सोने ठेवू शकता ?

CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स) नुसार, विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. तर अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने स्वत:जवळ ठेवू शकते. त्याच वेळी, एक माणूस 100 ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेवू शकतो.

सोने खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आत विकले गेले तर सरकार त्यावर अल्पकालीन भांडवली नफा कर लावते. त्याच वेळी, 3 वर्षांनंतर सोन्याच्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागतो.

पण यापेक्षा जास्तीचे सोने आढळल्यास तुम्हाला सोन्याचा व्हॅलीड प्रूफ द्यावा लागतो. जर सोन्याचा प्रूफ नसेल तर आयकर विभागाकडून असे सोने जप्त केले जाऊ शकते.

Leave a Comment