Cotton Crop Fertilizer : जर तुम्हीही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखलं जाते. या पिकाची राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कापूस लागवडीखालील क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मात्र उत्पादनाचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. याचाच अर्थ राज्यात कापसाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे. कापसाचे उत्पादन कमी होण्याचे अनेक कारणे आहेत.
यामध्ये कापूस पिकासाठी योग्य शिफारशीत खतांचा वापर न करणे हे देखील एक कारण आहे. वास्तविक कापूस पिकाला लागवड करण्यापूर्वी तसेच कापूस लागवड करताना किंवा मग कापूस लागवडीनंतर खत दिले जाते.
शेतकरी बांधव आपल्या नियोजनानुसार कापूस पिकाला खत देऊ शकतात. मात्र जर कापूस लागवडीनंतर खत द्यायचे असेल तर लागवड केल्यानंतर वीस दिवसांच्या आत खत दिल्यास उत्पादनात वाढ होते. जर खत देण्यास उशीर झाला तर उत्पादनात घट येऊ शकते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही कापूस लागवड केल्यानंतर खत देणार असाल तर लागवडीनंतर लगेचच काही दिवसात खत देणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान आज आपण कापूस पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कापूस पिकात कोणत्या खताचा वापर करणार ?
कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक एकर कापूस पिकासाठी 10 26 26 एक ते दीड बॅग खत दिले जाऊ शकते. किंवा 20 20 00 13 हे खत दीड ते दोन बॅग. किंवा 10 46 00 हे खत 1-1.5 बॅग + 25 किलो ग्रॅम पोटॅश. किंवा सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग + 25 किलो पोटॅश यापैकी कोणतेही एक खत वापरले जाऊ शकते.
जर कापूस लागवड करून 20 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर वर दिलेल्या खतांपैकी कोणत्याही एका खतासोबत 20 किलो युरिया वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.