Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाला पांढर सोन म्हणून ओळखल जात. याचे मुख्य कारण म्हणजे कापसाला बाजारात मोठी मागणी असते. याला बाजारात अगदी सोन्याप्रमाणे मागणी आहे. शिवाय अलीकडे कापसाचे बाजार भाव विक्रमी वाढले आहेत.
सोन्याप्रमाणेच याला भाव मिळत आहे. यामुळेच या कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखलं जातं. गेल्यावर्षी मात्र कापूस पिक शेतकऱ्यांसाठी अपेक्षित असे फायदेशीर ठरले नाही. गेल्या खरीप हंगामातील कापसाला चांगला भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मात्र असे असले तरी शेतकऱ्यांना यंदा कापूस पिकातून चांगली कमाई होण्याची आशा आहे. हेच कारण आहे की यावर्षी कापसाची खानदेश अर्थात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भ तसेच मराठवाड्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
राज्यातील खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या तीनही विभागात यंदा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मात्र जुलै महिन्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. गेल्या महिन्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. विशेष म्हणजे प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळाले आहे.
कापसाच्या शेतात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे कापूस पिकाची वाढ खुटण्याचा धोका आहे. यामुळे जर कापसाच्या पिकात पाणी साचले असेल तर लवकरात लवकर पाणी शेताबाहेर काढावे असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.
याशिवाय सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे कापूस पिकावर मावा तुडतुडे आणि फुलकिडे यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव देखील झाला आहे. याव्यतिरिक्त पिकावर इतरही अनेक बुरशीजन्य रोग पाहायला मिळत आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांनी वेळेतच तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन योग्य कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी करावी असा सल्ला यावेळी कृषी तज्ञांनी दिला आहे. तसेच जाणकार लोकांनी कापूस पिकासाठी पावसाळ्यात कोणते खत दिले पाहिजे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आज आपण याच विषयी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस पिकासाठी एक बॅग 10 26 26, अर्धी बॅग युरिया, पाच किलो झिंक सल्फेट, दोन किलो बोरॅक्स, पाच किलो फेरस सल्फेट, पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट याचा बेसल डोस दिला पाहिजे. जर तुम्ही पिकाला खताचा हा डोस दिला तर पिकाची जोमदार वाढ होईल आणि चांगली फळधारणा आणि फुलधारणा होईल असं मत कृषी तज्ञांनी व्यक्त केल आहे.