राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! आता शेतीचे पंचनामे पण होणार ऑनलाइन, ‘हे’ एप्लीकेशन झाले सुरु, काय फायदे होणार वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत मिळू शकणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेती पिकांचे पंचनामे केले जातात. मात्र हे पंचनामे करताना अनेकदा मोठा वेळ जातो आणि अचूक पंचनामे होत नाहीत. मात्र आता शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास अचूक पंचनामे करता येणार आहेत.

शिवाय पंचनामे देखील जलद गतीने होणार आहेत. कारण की, आता नुकसानीचे पंचनामे देखील ऑनलाइन होणार आहेत. यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. याला ई-पंचनामा असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान ऑनलाईन पंचनामा करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.

विशेष म्हणजे हा देशातला पहिला प्रयोग आपल्या नागपूर विभागात सुरू झाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ई-पंचनामा हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी 2012 पासून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी 2012 पासून सॉफ्टवेअर आणि एप्लीकेशन तयार करण्याची प्रोसेस सुरू होती.

दरम्यान आता ई-पंचनामा करण्यासाठीचे ॲप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात याचा वापरही सुरू झाला आहे. याबाबत प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महारिमोट सेंसिंग विभाग (एमसॅक) आणि महसूल व मदत व पुनर्वसन विभागाच्या मदतीने हे एप्लीकेशन तयार करण्यात आले आहे.

या अॅप्लिकेशनचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात आला असल्याने आता नागपुर विभागात शेती पिकांचे लवकरात लवकर पंचनामे होणार असून यामुळे शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करता येणार आहेत. साहजिकच याचा संबंधित विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कसा होतो ऑनलाइन पंचनामा 

ऑनलाइन पंचनामा किंवा ई-पंचनामा अंतर्गत नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वतः तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात. तेथील छायाचित्र घेऊन ते या प्रशासनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अॅप्लिकेशनवर अपलोड करतात. अॅप्लिकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्व्हे व गट क्रमांकनिहाय नुकसानीची ही माहिती तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांद्वारे भरण्यात येते.

या एप्लीकेशन मध्ये भरण्यात आलेली सर्व माहिती व शेतकऱ्यांकडून आधीच ई-पीक पाहणीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. या पडताळणीत ही माहिती बरोबर आहे की नाही हे चेक होते. नंतर मग तहसीलदारांकडून हा सर्व अहवाल चेक केला जातो.

मग विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे ही माहिती किंवा अहवाल पाठविला जातो. यानंतर मग ही माहिती राज्य शासनाकडे पाठविली जाते. मग जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होते, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

निश्चितच ई-पंचनामा या अभूतपूर्व उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने आणि अचूक होणार आहेत.

Leave a Comment