Dairy Business Scheme:- शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय भारतामध्ये फार पूर्वापार चालत आलेला असून सध्या परिस्थितीत या व्यवसायाला आता आधुनिक स्वरूप आले असल्याने मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय आता शेतकरी करू लागले आहेत.

त्यातल्या त्यात आता शेती आणि शेतीसंबंधी जोडधंद्यांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे  पशुपालनाशी संबंधित डेअरी म्हणजे दूध व्यवसाय मोठ्या व्यापक स्वरूपात केला जात असून दूध व्यवसायाला म्हणजेच डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करताना आपल्याला दिसून येते.

Advertisement

सरकारी योजनांच्या माध्यमातून  पशुपालनासाठी गोठ्यांची उभारणीपासून तर दूध काढण्याचे मशीन व गाय व म्हशींच्या खरेदीसाठी अनुदान व कर्ज दिले जाते. जर आपण या योजनांचा विचार केला तर यामध्ये दुग्ध व्यवसाय विकास योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेतून देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

 काय आहे दुग्ध व्यवसाय विकास योजना?

Advertisement

दुग्धविकास योजनेच्या माध्यमातून तुमचा डेअरी व्यवसायाचा जो काही एकूण प्रोजेक्ट साठीचा खर्च आहे त्याच्या दहा टक्के भांडवल शेतकऱ्यांना उभे करावी लागते. तसेच या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज मंजूर झाले तर शेतकऱ्यांना नऊ महिन्याच्या आतमध्ये डेअरी व्यवसाय सुरू करणे बंधनकारक आहे

व त्यानंतरच तुम्हाला या योजनेद्वारे मिळणारे अनुदानाची रक्कम दिली जात असते. डेअरी व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून कर्ज घेतलेले असते त्या बँकेतही अनुदानाची रक्कम जमा होते. हे कर्ज व अनुदानाचा वापर शेतकरी गोठ्याची उभारणी किंवा मिल्किंग मशीन व गाय तसेच म्हशींच्या खरेदीसाठी करू शकतात.

Advertisement

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

1- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला पोल्ट्री आणि दूध व्यवसायासाठी कर्ज घेता येते मात्र एकाच वेळी एकाच व्यवसायासाठी कर्ज दिले जात असते.

Advertisement

2- विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक शेतकऱ्यांना या माध्यमातून कर्ज मिळू शकते. परंतु त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागते.सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे एकत्र व्यवसाय करता येत नाही.

3- तसेच कुटुंबातील दोन व्यवसायामध्ये कमीत कमी पाचशे मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे.

Advertisement

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करावा अर्ज?

दूध व्यवसाय सुरू करण्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या डेअरी फार्मची नोंदणी करणे गरजेचे असते व त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन दूध व्यवसाय सुरू करण्यासाठीचा आवश्यक अनुदानाचा अर्ज करू शकतात. समजा यामध्ये जर तुम्हाला कर्ज जास्त प्रमाणात हवे असेल तर त्याकरिता तुमच्या डेअरी व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बँकेला देणे गरजेचे आहे. त्यासोबतच बँकेचे पासबुक तसेच आधार व पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागतात.

Advertisement

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुग्ध व्यवसाय विकास योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज व अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधने गरजेचे आहे व त्या ठिकाणी या योजनेबाबत सर्व माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.

Advertisement

यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही नाबार्ड बँकेच्या जवळच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात. याशिवाय तुम्ही  https://nabard.org या संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेची संपूर्ण माहिती समजून घेऊ शकता व जवळच्या बँकेत जाऊन तुमच्या दूध व्यवसायासाठीचा अर्ज करू शकतात.

या योजनेमधून किती मिळते अनुदान?

Advertisement

या योजनेच्या माध्यमातून दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्डच्या माध्यमातून तुमच्या एकूण प्रोजेक्टचा जो काही खर्च आहे त्यापैकी 33.33% अनुदान मिळते. तसेच याशिवाय दहा म्हशीच्या माध्यमातून दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सात लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळते.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 25% तर महिला शेतकरी व इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 33 टक्के अनुदानाचा लाभ मिळतो. एवढेच नाही तर दूध काढण्याचे मशीन व दूध ठेवण्यासाठी आवश्यक कूलिंग मशीन खरेदी करायचे असेल तर वीस लाखापर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *