Debit Card Insurance:- डेबिट कार्ड म्हणजेच आपण त्याला एटीएम कार्ड असे देखील म्हणतो व ते प्रत्येकाकडे असते. म्हणजे जो व्यक्ती बँकेमध्ये खाते उघडतो तेव्हा त्याला त्या बँकेकडून डेबिट कार्ड हे जारी केले जात असते. डेबिट कार्डचा वापर आपण  जास्त करून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करत असतो

व त्या व्यतिरिक्त एखादी ऑनलाइन शॉपिंग करताना देखील आपण हे कार्ड स्वाईप करून समोरच्या व्यक्तीला पेमेंट करत असतो. पेट्रोल पंपावर देखील मोठ्या प्रमाणावर स्वाईप करून आपण पेमेंट डेबिट कार्डच्या माध्यमातून करतो. इथपर्यंत आपल्याला डेबिट कार्डचे फायदे किंवा उपयोग जास्त करून माहिती आहेत.

Advertisement

परंतु या डेबिट कार्डच्या माध्यमातून एक मोठा फायदा काही विशिष्ट केसेस किंवा परिस्थितीमध्ये ग्राहकांना दिला जातो व तो म्हणजे  तुम्हाला या कार्डवर मोफत विमा संरक्षण देखील मिळते व हे आपल्यापैकी बरेच जणांना अजून पर्यंत देखील माहीत नसेल. याबाबतची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 डेबिट कार्डवर मिळते मोफत विमा संरक्षण

Advertisement

यामध्ये पाहिले तर काही बँकांचे डेबिट कार्ड हे काही विशिष्ट केसेस किंवा परिस्थितीमध्ये तीन कोटी रुपयांपर्यंतचा मोफत अपघात विमा संरक्षण देखील उपलब्ध करून देत असते. यामध्ये डेबिट कार्डधारकारकडून  विम्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रीमियम घेतला जात नाही

व एवढेच नाही तर संबंधित बँकेकडून याकरिता कुठल्याही प्रकारची कागदपत्रे देखील मागितले जात नाहीत. ही एक ग्रुप पॉलिसी असते व त्यामुळे या पॉलिसीचा कुठला नंबर देखील डेबिट कार्डधारकांकडे नसतो. परंतु हे मोफत अपघात विमा संरक्षण मिळवण्यासाठीच्या काही अटी व नियम देखील असतात.

Advertisement

 कुठल्या अटींना धरून डेबिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकते विमा संरक्षण

यासाठी असलेल्या नियम व अटीचा विचार केला तर यापैकी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे संबंधित डेबिट कार्डधारकाला ठराविक कालावधीमध्ये या डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करणे गरजेचे असते. जर आपण याबाबत एचडीएफसी बँकेच्या संकेतस्थळानुसार पाहिले तर एचडीएफसी बँकेच्या मिलेनिया डेबिट कार्डवर देशांतर्गत रेल्वे तसेच हवाई व रस्ते प्रवासाकरिता पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा संरक्षण मिळते.

Advertisement

परंतु याकरिता मात्र डेबिट कार्ड धारकाला तीस दिवसात किमान एक व्यवहार तरी करणे गरजेचे असते. समजा तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे डेबिट कार्ड वापरत असाल तर या बँकेच्या डेबिट कार्ड वर मोफत विमा कव्हर मिळवण्याकरिता तुम्हाला पात्र व्हायचे असेल तर कोटक महिंद्रा बँक क्लासिक डेबिट कार्डधारकाला गेल्या 30 दिवसात किमान पाचशे रुपयांचे किमान दोन व्यवहार तरी करणे आवश्यक असते.

बँकिंग ग्रुपची एमडी व प्रमुख प्रशांत जोशी यांच्या मते जर तुमच्याकडे डीबीएस बँकेचे इन्फिनिटी डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस किंवा ई-कॉमर्स ऑनलाईन व्यवहार करणे गरजेचे राहील. यामध्ये जर तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर ते ग्राह्य धरले जात नाहीत.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *