Demonetization News : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या दोन टर्म मध्ये अनेक मोठमोठे निर्णय घेतलेत. यातील काही निर्णयांवरून संपूर्ण देशात वादंग पेटले होते. काही लोकांनी मोदी सरकारच्या निर्णयांचे स्वागत केले तर काही लोकांनी मोदी सरकारला त्यांच्या पॉलिसीवरून फटकारले. नोटाबंदीचा निर्णय देखील असाच एक वादग्रस्त निर्णय ठरला आहे.
हा निर्णय देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेतला गेला असल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यात. नोटाबंदी केली.
यानंतर मोदी सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्यात. विशेष म्हणजे यातील दोन हजार रुपयांची नोट पुन्हा एकदा चलनातून बाद करण्यात आली आहे.
अशातच आता सोशल मीडियामध्ये नोटाबंदीबाबत एक मोठा दावा केला जाऊ लागला आहे. खरे तर सोशल मीडियावर नोटाबंदी बाबतच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सरकार लवकरच दहा रुपयांची नोट चलनातून बाद करणार असल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत.
याबाबतची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नागरिकांमध्ये यामुळे पॅनिक सिच्युएशन तयार झाली असून खरंच दहा रुपयाच्या नोटा चलनातून बाद होणार का, पुन्हा एकदा नोटाबंदी होणार का? हा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहा रुपयाच्या नोटा चलनातून बाद होणार अशा आशयाच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट बनावट आहेत.
ही केवळ अफवा आहे. सरकार दहा रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार नाहीये.रिझर्व बँक ऑफ इंडियाने अशी कोणतीच अधिसूचना काढलेली नाही.
खरे तर याआधी शंभर रुपयांची नोट चलनातून बाद होणार असाही दावा सोशल मीडियामध्ये करण्यात आला होता. मात्र ती देखील अफवा होती.