पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ महाविद्यालयात 180 रिक्त जागांसाठी भरती, थेट मुलाखतीने होणार निवड, कोण राहणार पात्र ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सांस्कृतिक राजधानी पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना पुण्यात नोकरी करायची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत येणाऱ्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय येथे विविध रिक्त पदांसाठी पदभरती आयोजित झाली आहे.

विशेष म्हणजे या पदभरती अंतर्गत तब्बल 181 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी थेट मुलाखतीने उमेदवारांची निवड होणार आहे. निश्चितच पात्र उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची ही सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान आता आपण या पद भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती ?

या पदभरती अंतर्गत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र, वाणिज्य, इंग्रजी, अर्थशास्त्र, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल/पर्यावरण शास्त्र, बीबीए या विषयाच्या शिक्षकांची भरती होणार आहे.

तसेच शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर व सेवक अशा पदांची भरती केली जाणार आहे.

किती पदांसाठी होणार भरती

या पदभरती अंतर्गत वर नमूद केलेल्या विविध पदांच्या 181 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वर नमूद केलेल्या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी राहणार आहे. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक राहणार आहे.

निवड प्रक्रिया

या पदभरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा थेट मुलाखत घेऊन भरल्या जाणार आहेत.

मुलाखत केव्हा होणार

मिळालेल्या माहितीनुसार 26 एप्रिल 27 एप्रिल आणि तीस एप्रिल ला ही मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मुलाखत या दिवशी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

मुलाखत कुठं होणार

साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे 410505 या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

https://drive.google.com/file/d/15hVW2Fjve8wpulNHioxwPgvZp7yHAIol/view या लिंक वर जाऊन या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment