तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाले आहे का ? मग घरबसल्या असे करा रिन्यू, वाचा संपूर्ण प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving License Renew : तुम्हीही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर वाहन चालवता का ? मग तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेलच. खरेतर भारतात वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो. हा वाहन परवाना आरटीओ कडून दिला जातो.

जर एखादा व्यक्ती विना वाहन परवाना वाहन चालवत असेल तर त्याच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई होऊ शकते. पोलीस विना वाहन परवाना वाहन चालवल्यास दंडात्मक कारवाई करू शकतात.

एवढेच नाही तर जर वाहन परवाना अर्थातच ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाले असेल आणि हे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू केलेले नसेल आणि असा व्यक्ती जर वाहन चालवताना आढळला तर पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

यामुळे जर तुमचेही ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाले असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर रिन्यू करून घेणे आवश्यक आहे.

दरम्यान आज आपण घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची प्रोसेस कशी असते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची प्रोसेस

जर तुमच ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल असेल म्हणजे त्याची मुदत संपली असेल तर तुम्हाला ते रिन्यू करावे लागणार आहे. जर तुम्हाला घरबसल्या यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अगदी दोन मिनिटात यासाठी अर्ज करू शकता.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला sarathi.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे गेल्यावर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.

मग तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मेनूमधून सर्व्हिस ऑन ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करावा लागेल.

यानंतर, तुम्हाला डाउनलोड केलेला फॉर्म भरावा लागेल आणि त्यासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फी जमा करावी लागेल, त्यानंतर तुमचे काम पूर्ण होईल.

Leave a Comment