बातमी कामाची ! ‘असं’ झालं तर ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे होणार रद्द ; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving License Update : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लोकसंख्येचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक आकडेवारी समोर आली होती या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. अर्थातच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीन या देशाला मागे टाकले आहे.

भारत सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला एक मोठा देश बनला आहे. देशात फक्त लोकसंख्याच वाढली आहे असे नाही तर लोकसंख्येप्रमाणेच वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. खाजगी वाहनांची संख्या गेल्या काही दशकात विक्रमी वाढली आहे.

शहरांपासून ते ग्रामीण भागात सर्वत्र वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. आगामी काळात तर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र वाहनांची संख्या वाढत असल्याने सध्या स्थितीला असलेली वाहतूक व्यवस्था तोकडी सिद्ध होत आहे.

यामुळे देशातील जवळपास सर्वच शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या महामार्गांवर होणारी वाहतूक कोंडी आणि यामुळे होणारे अपघात ही अलीकडे आपल्या देशात एक महत्त्वाची समस्या बनली आहे.

दरम्यान अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम नागरिकांनी अधिक काटेकोरपणे पाळले पाहिजेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान परिवहन विभागाने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवताना नागरिकांनी जर वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द केले जाईल असा इशारा दिला आहे. खरंतर आपल्या देशात वाहनचालकांसाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून काही नियम तयार करण्यात आले आहेत.

जर वाहन चालकांनी या वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही तर मात्र मग वाहन चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाते. विशेष म्हणजे काही प्रसंगी वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले जाते.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वाहनचालकाने तीन वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द होत असतो. जर एखाद्या वाहनाचालकाचा परवाना हा कायमस्वरूपी रद्द झाला तर त्या वाहनचालकाला पुन्हा नव्याने वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी पुन्हा रीतसर लर्निंग लायसन्स काढावे लागते.

म्हणजेच तीनदा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर संबंधित वाहनाचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द होतो. वाहनचालकांवर अति वेगाने वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक, ड्रंक अँड ड्राईव्ह, डोक्यात हेल्मेट परिधान न करणे, अतिभार वाहने, सिग्नल तोडणे या कारणांवरून कारवाई केली जाते.

वाहतुकीच्या या नियमांचे पालन केले नाही तर वाहनचालकाचा परवाना निलंबित केला जातो. यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांनी नियमांच्या चौकटीत राहणे अपेक्षित आहे. जर एखाद्या व्यक्तीने सातत्याने नियम तोडले असतील तर त्यांच ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द होऊ शकते.

Leave a Comment