महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे स्वर्गापेक्षा कमी नाहीत; परिवारासमवेत मनमुराद आनंद लुटता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Famous Tourist Spot In Maharashtra : पावसाळ्यात पर्यटक देशभरातील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. पावसाळा ऋतू पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. जर तुम्हीही पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.

खरंतर येत्या काही दिवसात पावसाळा संपणार आहे. अशा स्थितीत जर तुम्ही पावसाळ्याच्या सरते शेवटी कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण विदर्भातील काही फेमस टुरिस्ट स्पॉट बाबत जाणून घेणार आहोत. खरंतर विदर्भात अशी अनेक टुरिस्ट स्पॉट आहेत जी पर्यटकांना भुरळ पाडतात. आज आपण विदर्भातील नागपूरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळांबाबत जाणून घेणार आहोत.

मुंबई, पुण्यानंतर नागपूर शहराचा नंबर लागतो. नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळख प्राप्त आहे. नागपूरमध्ये संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असल्याने या शहराला संत्र्यांचे शहर म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुम्ही नागपूर शहराला भेट देऊ शकता. येथे तुम्ही आपल्या परिवारासमवेत जाऊ शकता आणि आपल्या ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

फुटाळा तलाव : नागपूर मध्ये फिरण्यासारखे शेकडो ठिकाणे आहेत मात्र फुटाळा तलावाची बातच न्यारी आहे. हा तलाव नागपूर शहराच्या पश्चिम भागात वसलेला आहे. या तलावाला तेलंगखेडी तलाव म्हणून देखील ओळखले जाते.

जपानी रोज गार्डन : नागपूरला गेलात तर जपानी रोज गार्डनला अवश्य भेट द्या. या उद्यानाला भेट दिल्याशिवाय तुमची नागपूरची ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. हे गार्डन नागपूर मधील एक प्रसिद्ध गार्डन आहे. नागपूरच्या सिव्हिल लाईन भागात हे गार्डन वसलेले आहे. येथील लॉन, रंगीबिरंगी फुले आणि शांत वातावरण पर्यटकांना भुरळ पाडते.

दीक्षाभूमी : हे नागपूरमधील एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. यां ठिकाणाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. येथे आशियातील सर्वात मोठा स्तूप आहे. ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. कुटुंबासमवेत फिरण्यासाठी हे ठिकाण चांगले आहे.

अंबाझरी तलाव : फुटाळा तलावासारखाच हा देखील तलाव फिरण्यासाठी चांगला पर्याय आहे. वन डे ट्रिप साठी हा पर्याय फायदेशीर ठरतो. इथे तुम्हाला विविध पक्षांचे दर्शन घडते. जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर या तलावाला नक्कीच भेट द्या. पक्षी निरीक्षणासाठी फॅमिलीसोबत तसेच तुमच्या पार्टनर सोबत फिरण्यासाठी हे एक सुंदर डेस्टिनेशन आहे. येथील सुंदर दृश्यांचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता.

रामटेक मंदिर : नागपूर पासून हाकेच्या अंतरावर वसलेले रामटेक मंदिर डोंगरावर स्थित आहे. या मंदिरावरून आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विहंगम दृश्य पहावयास मिळते.

Leave a Comment