Farmer Scheme : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत.
2014 मध्ये काँग्रेस सरकारला हद्दबाहेर करून देशाची सत्ता काबीज केलेल्या भाजपाने देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या आणि अतिशय कौतुकास्पद अशा योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता मिळतो.
केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आता याचा पंधरावा हप्ता केव्हा मिळणार ? हा प्रश्न या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात विविध सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा मोठा सण साजरा होणार आहे. तसेच नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे.
अशातच या सणासुदीच्या दिवसात केंद्रातील मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना एक मोठी गुड न्यूज देणार आहे. या योजनेचा पंधरावा हप्ता हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. याबाबत केंद्र शासनाने अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही मात्र या योजनेचा हप्ता हा दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.
यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकतो अशी शक्यता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये वर्तवली जात आहे. निश्चितच, केंद्रातील मोदी सरकारने पुढील हप्ता जर सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला तर शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे.