गुरुजी मानलं तुम्हाला; पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पिकवलं काश्मिरचं सफरचंद ! मिळवले लाखोंच उत्पादन, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने शेतीत सफरचंद शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. खरे तर जिल्ह्यातील शेतकरी बांधव नेहमीच नवनवीन प्रयोगामुळे चर्चेत राहतात. शेती व्यवसायात आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत.

अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट दुष्काळ यांसारख्या नानाविध अशा संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय फायद्याचा बनवला आहे. दरम्यान जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या एका सेवानिवृत्त शिक्षकाने शिक्षकी व्यवसाय सोडल्यानंतर शेतीमध्ये नवनवीन आधुनिक प्रयोग करत लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.

आधुनिक कृषी तंत्राच्या मदतीने सदर शिक्षकाने चक्क काश्मिरी फळ म्हणून ओळखले जाणारे सफरचंद लागवड केली आहे. सफरचंद हे एक थंड हवामानात वाढणारे पीक आहे. याची लागवड प्रामुख्याने काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्येच पाहायला मिळते.

अलीकडे मात्र इतर मैदानी भागात देखील सफरचंद शेती केली जाऊ लागली आहे. प्रायोगिक तत्त्वावर का होईना पण देशातील इतरही भागातील शेतकऱ्यांनी सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली आहे.

विशेष म्हणजे या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी या पिकातून चांगले उत्पन्न देखील मिळवले आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर खरात यांनी देखील अशीच कामगिरी केली आहे.

त्यांनी पुण्यातील उष्ण हवामानात सफरचंदाचे पीक उत्पादित करण्याची किमया साधली असल्याने सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. खरात यांनी सांगितल्याप्रमाणे, शाळेतुन रिटायर झाल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सफरचंद लागवड करण्याचे ठरवले यासाठी दार्जिलिंग येथून रोप मागवली. रोपांची लागवड झाली आणि अवघ्या 15 ते 19 महिन्यांच्या काळात यातून त्यांना उत्पादन मिळाले.

खरात यांचा मुलगा किशोर हा काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याने तेथे सफरचंदाची बाग पाहिली आणि आपल्या वडिलांना आणि भावाला याबाबत माहिती दिली. यानंतर खरात कुटुंबियांनी सफरचंद लागवड केली.

सुरुवातीला दहा गुंठ्यात लागवड केली. प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुन्हा दहा गुंठ्यावर याची लागवड वाढवली.

आता खरात कुटुंबीय गेल्या चार वर्षांपासून सफरचंदचे उत्पादन घेऊ लागले आहेत. यातून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. यामुळे गुरुजींचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत असून. या प्रयोगातून तरुणांना निश्चितच अनेक नवीन गोष्टी शिकता येणार आहेत.

Leave a Comment