शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; खरीपात तुरीच्या ‘या’ 3 पैकी कोणत्याही एका जातीची लागवड करा, दर्जेदार उत्पादन मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming News : नमस्कार शेतकरी मित्रांनो ! जर तुम्हीही खरीप हंगामात तूर लागवड करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर, मान्सूनच आगमन तळकोकणात तसेच दक्षिण महाराष्ट्रात झाल आहे. मात्र पुढे मान्सून सरकण्यास परिस्थिती अनुकूल नसल्याचे चित्र आहे.

परंतु येत्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पाऊस येत्या काही तासात सुरू होईल अशी आशा आहे. दरम्यान पावसासोबतच शेतकऱ्यांच्या शेती कामाची लगबग देखील सुरू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पेरणीच्या कामासाठी शेतकऱ्यांचे धावपळ पाहायला मिळणार आहे.

राज्यात सोयाबीन, कापूस या पिकांसोबतच तूर या पिकाची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. विशेष बाब म्हणजे यंदा मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले आहे तसेच राज्यातील बहुतांशी भागात आगमन झालेले नाही. यामुळे यंदा शेतकरी कापूस ऐवजी तुर पिकाला प्राधान्य देतील असे चित्र आहे.

जर तुम्हीही यंदा तूर लागवड करण्याचा विचार करत असाल तर तुरीच्या सुधारित वाणाची मात्र लागवड करा जेणेकरून पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होईल. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी तुरीच्या टॉप 3 जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया तुरीच्या टॉप तीन सुधारित जाती.

तुरीच्या टॉप 3 जाती

आयसीपीएल 87119 आशा :- राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा वाण विशेष लोकप्रिय आहे. मराठवाडा विदर्भात या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. या वाणाचा पीक परीपक्व कालावधी हा जवळपास 190 दिवसांचा आहे. या जातीचे दाणे हे लाल रंगाचे असतात. हा वाण मर व वांझ रोगास प्रतिकारक असल्याचा दावा काही जाणकार लोकांनी केला आहे. शेंगा पोखरणाऱ्या कीटकांसाठी हा वाण प्रतिकारक आहे तसेच या जातीपासून टपोरे दाणे मिळतात. म्हणून या जातीला शेतकरी बांधव पसंती दाखवत आहेत.

फुले राजेश्वरी :- नावावरून आपल्या लक्षात आले असेल की हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा हा एक सुधारित वाण असून लवकर परिपक्व होणाऱ्या तुरीच्या सुधारित जातींमध्ये याची गणना केली जाते. हा वाण मात्र 140 दिवसात काढणीस तयार होतो असा दावा आहे. या वाणाची सलग लागवड केली जाते तसेच आंतरपीक म्हणून देखील हा वाण उत्तम आहे. या जातींचे दाणे देखील लाल असतात. म्हणून याला बाजारात चांगला दरही मिळतो.

BDN 708 अमोल :- ही देखील महाराष्ट्रात उत्पादित होणारी तुरीची एक सुधारित जात आहे. या जातीची लागवड राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरडवाहू भागात लागवड करण्यासाठी या जातीची शिफारस केली जाते. मध्यम जमिनीत या जातीची लागवड करण्याचा सल्ला जाणकार देतात. साधारणता 155 ते 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनत असते. निश्चितच या वाणाची पेरणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Leave a Comment