FD News : भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी काही लोक सरकारी बचत योजनांमध्ये पैसा गुंतवत आहेत. तसेच काहीजण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करत आहेत. अलीकडे देशातील विविध बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे.
महिला वर्ग देखील आता एफडी करण्याला विशेष प्राधान्य दाखवत आहे. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण देशातील अशा टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत. खरे तर नॅशनल बँकांच्या तुलनेत नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या एफडीवर अधिक व्याज देत आहेत.
अनेक नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या एफडीवर तब्बल नऊ टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहेत. काही बँका याहीपेक्षा अधिकचे व्याज देत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया देशातील टॉप पाच एनबीएफसी ज्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : मिळालेल्या माहितीनुसार, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 9.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.60 टक्के एवढे व्याज देत आहे. हे व्याज 5 वर्षांच्या FD वर दिले जात आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत एफडी करणे देखील ग्राहकांना परवडणार आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1001 दिवसांच्या FD वर 9 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50 टक्के व्याज देत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या FD वर 8.51 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.11 टक्के व्याज देत आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : ही बँक देखील एफडी वर चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेच्या माध्यमातून आपल्या सामान्य ग्राहकांना 888 दिवसांच्या FD वर 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9% एवढे व्याज दिले जात आहे. म्हणजे जर तुम्हाला कमी कालावधीसाठी एफडी करायची असेल तर या बँकेचा पर्याय सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.
ESAF स्मॉल फायनान्स बँक : ESAF स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या सामान्य ग्राहकांना 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी FD वर 8.50 टक्के आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना 0.50 टक्के अधिकचे व्याज म्हणजेच 9% व्याज देत आहे. जर तुम्ही दोन वर्ष ते तीन वर्ष कालावधीची एफडी करण्याच्या तयारीत असाल तर या बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.