FD करणाऱ्यांनाही मिळणार जबरदस्त रिटर्न, ‘या’ बँका देत आहेत चक्क 9.5% चे व्याजदर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : अलीकडे बचतीबरोबरच पैशांच्या गुंतवणुकीला सुद्धा विशेष महत्त्व दिले जात आहे. जर तुम्हीही तुमच्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याच्या तयारीत असाल तर एफडी म्हणजेच मुदत ठेव योजना तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.

मुदत ठेव योजनेत अलीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली आहे. याचे कारण म्हणजे बँकांच्या माध्यमातून आता एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे.

हेच कारण आहे की, अनेक महिला गुंतवणूकदार देखील आता एफडीकडे वळल्या आहेत. नाहीतर महिला गुंतवणूकदार आधी सोन्यात गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवत असत.

परंतु एफडी मधूनही चांगले रिटर्न मिळत असल्याने आता महिला गुंतवणूकदारांचा कल एफडीकडे वळला आहे. दरम्यान आज आपण एफ डी वर 9.5% पर्यंतचे व्याज देणाऱ्या देशातील काही बँकांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

त्यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवण्याच्या नियोजनात असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.

एफडीवर सर्वोत्कृष्ट व्याज देणाऱ्या बँका

युनिटी स्मॉल फायनान्स बँक : युनिटी स्मॉल फायनान्स बँक एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 1001 दिवसाच्या एफडीवर सिनिअर सिटीजन ग्राहकांना 9.5% एवढे इंटरेस्ट देत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : मिळालेल्या माहितीनुसार सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना पाच वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न देत आहे. बँक पाच वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 9.25% एवढे जबरदस्त व्याज देत आहे.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : या बँकेकडून 555 दिवसांच्या एफडी साठी सीनियर सिटीजन ग्राहकांना 9.25% एवढे व्याज दिले जात आहे. तसेच ही बँक 1111 दिवसांच्या एफडी साठी देखील एवढेच व्याजदर सीनियर सिटीजन ग्राहकांना देत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : मीडिया रिपोर्टनुसार ही बँक 444 दिवसांच्या एफडीवर सीनियर सिटीजन ग्राहकांना नऊ टक्के एवढे व्याज ऑफर करत आहे.

जना स्मॉल फायनान्स बँक : ही बँक एक वर्ष कालावधीच्या एफडी साठी सीनियर सिटीजन ग्राहकांना नऊ टक्के एवढे व्याज देत आहे. बँकेची ही सर्वात जास्त व्याज देणारी एफडी योजना देखील आहे.

Leave a Comment