FD News : तुम्हालाही FD मध्ये गुंतवणुकीसाठी चांगले व्याजदर कुठे मिळतं आहे हे जाणून घ्यायचे आहे का? अहो मग ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे. अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येकालाच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आवडतो. जेव्हाही सुरक्षित गुंतवणुकीचा विषय येतो तेव्हा बँकेची एफडी योजना हा सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे सांगितले जाते.
अनेक जाणकार लोक देखील जर सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर बँकेची एफडी योजना हा बेस्ट पर्याय असल्याचे सांगतात. अलीकडे तर बँकांनी फिक्स डिपॉझिटचे व्याजदर चांगलेच वाढवले आहेत. यामुळे महिला वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात मुदत ठेव योजनेत आपले पैसे गुंतवत आहेत.
मात्र असे असले तरी अनेकांच्या माध्यमातून एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करणाऱ्या बँका कोणत्या असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. खरेतर काही खासगी बँकांकडून एफडीवर बंपर व्याज दिले जात आहे.
रेपो रेट ६.५ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर अनेक बँका एफडीवर चांगला परतावा देत आहेत. युनिटी आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक त्यांच्या ग्राहकांना 9 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत.
या दोन्ही लघु वित्त बँकांमधील काही मुदतीच्या FD वरील गुंतवणूक PPF, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या गुंतवणूक योजनांपेक्षा अधिकचा व्याज परतावा देत असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याचा तयारीत असाल तर युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक येथे एफडी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक : ही बँक FD वर नियमित ग्राहकांना ४.५% ते ९% पर्यंत व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 5% ते 9.5% एवढे व्याज ऑफर करत आहे.
या बँकेच्या माध्यमातून 1001 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज दिले जात आहे. या कालावधीच्या एफ डी साठी नियमित ग्राहकांना नऊ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.5% एवढे व्याज दिले जात आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 4% ते 9.1% पर्यंत व्याज देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.5% ते 9.6% पर्यंत व्याज मिळत आहे. ही बँक नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या ठेवींवर 9.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.60% एवढा व्याजदर ऑफर करत आहे.