FD News : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली आहे. शिवाय आधीप्रमाणेच सोने आणि चांदीमध्ये देखील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते.

तथापि आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे एफडीलाच प्राधान्य देतात. बँकेची एफडी योजना ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आहे. बँकेच्या एफडी योजनेतून गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळण्याची हमी असते.

Advertisement

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. म्हणजेच एफडीचे पैसे बुडत नाहीत. अशा परिस्थितीत, अनेक जण एफडी करण्याला महत्त्व दाखवतात.

दरम्यान, आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे की एफडी वर चांगले व्याज ऑफर करत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

Advertisement

कोणती बँक देते एफडीवर सर्वोच्च व्याज

SBM Bank FD : ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्ष कालावधीच्या मुदत ठेव योजनेवर सर्वोच्च व्याजदर ऑफर करते हे विशेष. म्हणजेच जर तुम्हाला तीन वर्षे कालावधीसाठी मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल तर या बँकेची मुदत ठेवी योजना तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकते.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार सामान्य ग्राहकांनाही बँक तीन वर्षांच्या एफडीवर 8.10% आणि जेष्ठ नागरिकांना 8.60% एवढे व्याज वापर करत आहेत. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनाही बँक 0.50% अधिकचे व्याजदर देते. अर्थातच सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ ग्राहकांना या बँकेकडून अधिक व्याज दिले जाते.

DCB Bank FD : ही बँक देखील आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर चांगले व्याज देते. तीन वर्षांच्या कालावधीच्या FD साठी डीसीबी बँकेकडून आपल्या ग्राहकांना सर्वोच्च व्याज दिले जात आहे.

Advertisement

सामान्य ग्राहकांना ही बँक तीन वर्ष कालावधीच्या एफडी साठी आठ टक्के एवढे व्याज दिले जात आहे. तसेच ज्येष्ठ ग्राहकांना ही बँक 8.60% एवढे व्याज देत आहे.

Yes Bank FD : या यादीत येस बँकेचा देखील समावेश होतो. येस बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर चांगले व्याज देत आहे. बँकेकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी केल्या जाणाऱ्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.75 टक्के एवढे व्याज दिले जाते.

Advertisement

मात्र जर ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी या एफडी योजनेत गुंतवणूक केली म्हणजेच तीन वर्ष कालावधीच्या एफडीत गुंतवणूक केली तर त्यांना 8.25 टक्के एवढेच व्याज मिळते.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *