FD News : आपल्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळे अनेकजण बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. मात्र अनेकांच्या माध्यमातून या सुरक्षित योजनेत गुंतवलेल्या पैशांवर चांगले व्याज मिळत नसल्याची तक्रार केली जाते.
बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास अपेक्षित परतावा मिळत नसल्याने अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत ही वास्तविकता नाकारून चालणार नाही.
तथापि देशात अशाही काही स्मॉल फायनान्स बँक आहेत ज्या की आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करत आहेत.
दरम्यान आज आपण अशाच एका बँकेची एफडी योजना जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 10.60% एवढे व्याज दिले जात आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोणती बँक देते सर्वाधिक रिटर्न
नॅशनल बँकेच्या तुलनेत देशातील प्रमुख स्मॉल फायनान्स बँका एफडीवर चांगले रिटर्न देत आहेत. आपल्या ग्राहकांना एफडी योजनेत गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे हेतू अनेक स्मॉल फायनान्स बँकांनी आपले व्याजदर वाढवलेले आहेत.
अनेक स्मॉल फायनान्स बँकां आपल्या गुंतवणूकदारांना 9% हून अधिकचा परतावा देत आहेत. एवढेच नाही तर लोकमान्य सहकारी पतसंस्था ही वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर तब्बल 10.60% एवढे विक्रमी व्याज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य सहकारी पतसंस्था अशी एक मुदत ठेव योजना राबवत आहे ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळतोय.
सदर बँकेच्या माध्यमातून अनेक मुदत ठेवी योजना राबवल्या जात आहेत. बँकेची री इन्वेस्टमेंट डिपॉझिट स्कीम अशीच एक एफडी योजना आहे.
या री इन्वेस्टमेंट डिपॉझिट स्कीम मध्ये बँकेच्या एफडीत पुन्हा गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदारांना 10.60% पर्यंतचे व्याज दिले जात आहे विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आणखी 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. या री इन्वेस्टमेंट डिपॉझिट स्कीममध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना मात्र हा व्याजदर लागू होणार नाही.
जे ग्राहक या योजनेत दुसऱ्यांदा गुंतवणूक करतील त्यांना हा विक्रमी व्याजदर लागू होणार आहे. तथापि याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.