महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये 28 एप्रिल पर्यंत तुफान गारपीटीची शक्यता ! हवामान खात्याचा नवीन अंदाज चिंता वाढवतोय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain And Hailstorm : हवामान खात्याने नुकताच एक नवीन अंदाज दिला आहे. हा अंदाज मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे सत्र सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आगामी काही दिवस असेच नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण की हवामान खात्याने एक नवीन अंदाज दिला असून या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 28 एप्रिल पर्यंत वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.

यामुळे आधीच नैसर्गिक संकटांमुळे बेजार झालेल्या बळीराजाला मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. आधीच गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाहीये.

दरम्यान रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात फारसा भावही मिळत नाहीये.

यामुळे शेतकरी राजा आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे पूर्णपणे हातबल झाला असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. आज देखील राज्यातील कोकण विभागात उष्णतेची लाट येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईसह दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज पासून 28 एप्रिल पर्यंत राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होणार असा अंदाज आहे.

आय एम डी ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार यवतमाळ ,भंडारा , गोंदिया , गडचिरोली , वर्धा , नागपुर , वाशिम , चंद्रपुर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील लातुर व धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रमधील सोलापुर या 11 जिल्ह्यांमध्ये 28 एप्रिल पर्यंत वादळी पाऊस आणि गारपीट होणार अशी शक्यता आहे.

या कालावधीत काही ठिकाणी तुफान गारपीट होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.

एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सावट अजूनही दूर झालेले नाहीये. आणखी काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग कायम राहणार असा अंदाज आहे.

Leave a Comment