होम लोन घेताय ? मग ‘हा’ पर्याय वापरा, 7 लाखांचा फायदा होणार, कसं ते वाचाच ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan News : आपल्या हक्काचे एक स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या हक्काच्या घरात आपले उर्वरित आयुष्य परिवारासमवेत आनंदात घालवता यावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मात्र, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने, घराचे स्वप्न सहजतेने पूर्ण होत नाही.

जीवाचा मोठा आटापिटा करूनही अनेकांना घर घेता येणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, अनेक जण गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. गृह कर्ज घेऊन आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते.

दरम्यान जर तुम्हीही तुमच्या नवीन घरासाठी गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. आज आपण गृह कर्ज घेऊन 7 लाख रुपये कसे वाचवले जाऊ शकतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जॉईंट होम लोन घेतल्यास पैसे वाचणार

जर तुम्ही गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही तुमच्या पत्नी समवेत किंवा इतर अन्य व्यक्ती सोबत जॉईंट होम लोन घेऊ शकता. तुमच्या आईसोबत किंवा पत्नीसोबत तुम्ही जॉईंट होम लोन घेतल्यास तुम्हाला आयकर सवलतीचा दुहेरी लाभ मिळवता येणार आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, होमलोन काढल्यास तुम्हाला आयकर कायदा कलम ८० (सी) आणि कलम २४ (बी) नुसार सवलतीचा लाभ मिळू शकतो. म्हणजे जर तुम्ही जॉईंट होम लोन काढले तर या८० (सी) नुसार दोन्ही कर्जदारांना १.५ लाखांचे टॅक्स बेनिफिट मिळणार आहे.

जर तुम्ही तुमच्या आईसोबत किंवा पत्नीसोबत जॉईंट होम लोन काढले असेल तर तुम्हाला दीड लाख रुपयाचे आणि तुमच्या सह अर्जदाराला दीड लाख रुपयांचे म्हणजेच एकूण तीन लाख रुपयांचे टॅक्स बेनिफिट मिळणार आहेत.

एवढेच नाही तर जॉईंट होम लोन काढल्यास कलम २४ (बी) नुसार तुम्हाला आणि तुमच्या सह अर्जदाराला व्याजात प्रत्येकी २ लाखांपर्यंत सूट मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला दोन लाख रुपये आणि तुमच्या सह अर्जदाराला दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये व्याज सवलत मिळू शकते.

अर्थातच जॉईंट होम लोन काढल्यास तीन लाख रुपयाचा टॅक्स बेनिफिट आणि व्याज सवलत चार लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये वाचवता येणार आहेत.

या अटींचे पालन करावे लागणार?

7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळवायचा असेल तर जॉईंट होम लोन काढताना सदर प्रॉपर्टीचे दोन्ही अर्जदार सहमालक असले पाहिजेत.

घराची नोंदणी करताना दुसऱ्या व्यक्तीची नोंद सह कर्जदार (को बोरॉअर) म्हणून नोंद करायची आहे.

जॉईंट होम लोन अंतर्गत कर्ज काढल्यास सहकर्जदाराने देखील कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.

Leave a Comment