एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी बँकेने एफडी व्याजदरात केली मोठी वाढ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : गेल्या काही वर्षांमध्ये मुदत ठेव योजनेत अर्थातच एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने अनेकजण आता एफडीला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे देशातील अनेक बँकानी एफडी व्याज दरात वाढ केली आहे.

यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सध्याचा काळ हा FD साठी सर्वोत्कृष्ट काळ आहे.

एफ डी मध्ये आता गुंतवणूक केली तर चांगले रिटर्न मिळू शकणार आहेत. अशातच एफडी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे देशातील एका प्रमुख सरकारी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. खरेतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थातच RBI ने 5 एप्रिल 2024 रोजी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वि-मासिक पतधोरण आढावा बैठक घेतली.

या बैठकीत आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेट मध्ये कोणताच बदल केला नाही. यावेळी रेपो रेटमध्ये बदल होणार असे म्हटले जात होते मात्र आरबीआयने रेपो रेट कायम ठेवले आहेत. रेपो रेट अजूनही 6.5% एवढाच आहे.

हेच कारण आहे की पुढील काही महिने एफडीचे व्याजदर असेच कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. किंबहुना एफडीच्या व्याजदरात सुधारणा होऊ शकते असे मत तज्ञ लोकांनी व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे यानुसार आता व्याजदर वाढू देखील लागले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँक या सरकारी बँकेने एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. त्यामुळे या बँकेच्या मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ओव्हरसीज बँकेकडून दोन कोटी रुपयांपर्यंतच्या काही कालावधीच्या FD व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. एफडी व्याजदरात या बँकेने 0.50 टक्के एवढी वाढ केली आहे.

या बदलानंतर आता इंडियन ओव्हरसीज बँक 444 दिवसांच्या कालावधीच्या एफडीसाठी सामान्य ग्राहकांना 7.30 टक्के, ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.80% आणि सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 8.05 टक्के एवढे व्याजदर मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे नवीन दर आजपासून अर्थातच 15 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात एफडी करणाऱ्यांना याचा चांगला फायदा होऊ शकणार आहे.

Leave a Comment