FD News : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या देशातील तीन महत्वाच्या नॅशनल बँका आहेत. यातील एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या प्रायव्हेट सेक्टरमधील बँका आहेत. एचडीएफसी तर देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे.
दरम्यान आज आपण या तिन्ही बँकांचे एफ डी व्याजदर कम्पेअर करणार आहोत. यातील कोणती बँक एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरू शकते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
एसबीआयचे FD व्याजदर : SBI 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर सर्वसामान्यांना 3 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ३.५० टक्के आहे. 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी, बँक सर्वसामान्यांना 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के दराने व्याज देत आहे.
एचडीएफसीचे एफ डी व्याजदर : HDFC बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3 टक्के व्याज दर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते 3.50 टक्के आहे. 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे कालावधीसाठी निवडलेल्या सामान्य ग्राहकांसाठी, व्याज दर 7 टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज मिळेल.
ICICI FD व्याजदर : ही बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना 3 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ३.५० टक्के एवढा असल्याची माहिती समोर आली आहे.
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या म्हणजेच दीड वर्षांपेक्षा कमीच्या FD वर बँक सर्वसामान्यांना 7.20 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज ऑफर करत आहे. 18 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना 7.20 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.