सणासुदीच्या दिवसात नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा महागल्या, किती वाढलेत भाव ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Cylinder Price Maharashtra Hike : ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. खरंतर हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो. दरम्यान संक्रमणाच्या महिन्यात तापमानात मोठी वाढ होत असते.

यामुळे येत्या काही दिवसात ऑक्टोबर हिटचा अनुभव येणार आहे. येत्या काही दिवसानंतर उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागणार आहेत. हवामान खात्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार मात्र तदनंतर पाऊस विश्रांती येईल आणि कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

याचाच अर्थ ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. उन्हाच्या झळा सहन करण्यापूर्वी मात्र नागरिकांना महागाईची झळ बसणार आहे. कारण की आजपासून गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

खरतर ऑक्टोबर महिन्यात घटस्थापना, विजयादशमी, दुर्गाष्टमी विविध सण साजरे केले जाणार आहेत. अशा स्थितीत गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली ही वाढ नागरिकांसाठी निश्चितच मारक ठरणार असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत आजपासून 200 रुपयांनी वाढणार आहे.

म्हणजे घरगुती गॅसच्या किमती वाढणार नाहीत तर व्यावसायिक अर्थातच कमर्शियल गॅसच्या किमती वाढणार आहे. आयओसीएलच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. वास्तविक, कमर्शियल गॅसच्या अर्थातच 19 किलो गॅस सिलेंडरच्या किमती ऑगस्ट महिन्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी कमर्शियल गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या.

पण अवघ्या एका महिन्याच्या काळातच आता या कमर्शियल गॅसच्या किमती मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. एक ऑक्टोबर 2023 पासून 19 किलो गॅस सिलेंडर अर्थातच कमर्शियल गॅस सिलेंडर 200 रुपयांनी महाग होणार आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यातही घरगुती गॅसच्या किमती सप्टेंबरमध्ये जेवढ्या होत्या तेवढ्याच राहणार आहेत.

19 किलो गॅस सिलेंडरचे दर किती ? 

आता या नव्या दरवाढीनुसार, राजधानी मुंबईमध्ये कमर्शियल गॅसच्या किमती 1684 रुपयावर पोहचल्या आहेत. तसेच राजधानी नवी दिल्लीत 19 किलो ग्रॅम सॅस सिलिंडरचे दर 1731.50 रुपयावर पोहचले आहेत. कोलकात्यातील 19 किलो गॅस सिलेंडरचे दर 1839.50 रुपये झाले आहेत.

Leave a Comment