केंद्र शासन भारतमाला परीयोजनेअंतर्गत महाराष्ट्रात विकसित करणार ‘हा’ नवीन महामार्ग ! 405 किलोमीटर अंतरासाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च, कसा असणार रूट?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खरंतर कोणत्याही विकसित राष्ट्रांमध्ये तेथील दळणवळण व्यवस्था तसेच इतर पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

हेच कारण आहे की केंद्र सरकारने देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहे. देशभरात सध्या विविध महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी केंद्र शासनाकडून भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या परियोजने अंतर्गत जवळपास देशभरात 3000 किलोमीटर पेक्षा अधिकचे महामार्ग तयार केले जाणार आहेत.

विशेष म्हणजे या अंतर्गत तयार होणारे सर्व महामार्ग ग्रीन फील्ड महामार्ग राहणार आहे. देशभरातील विविध शहरे परस्परांना रस्ते मार्गाने कनेक्ट करण्यासाठी केंद्र शासनाची ही योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातही विविध महामार्गांची उभारणी केली जात आहे.

यामध्ये नागपूर ते विजयवाडा दरम्यान तयार होणाऱ्या ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. हा महामार्ग महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान आज आपण या महामार्गा विषयी सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार हा महामार्ग?

हा मार्ग महाराष्ट्र, तेलंगणा आंध्रप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर शहर विदर्भातील एक महत्त्वाचे शहर आहे. अशा परिस्थितीत हा महामार्ग नागपूर सहित संपूर्ण विदर्भासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

विजयवाडा हे आंध्र प्रदेश मधील एक महत्त्वाचे शहर असून मुंबई प्रमाणेच हे देशातील एक महत्त्वाचे बंदर आहे. या बंदरातून देशातील मालाची विदेशात निर्यात होते तसेच या बंदरात देशातूनही मोठ्या प्रमाणात माल आयात केला जातो. अशा स्थितीत नागपूर ते विजयवाडा दरम्यान हा ग्रीन फील्ड महामार्ग विकसित केला जाणार आहे.

हा महामार्ग चार पदरी राहणार असून याची एकूण लांबी 405 किलोमीटर एवढी असेल. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित केला जात आहे. हा रस्ता काही भागात ग्रीन फील्ड आणि काही भागात ब्राऊनफिल्ड राहणार आहे. या मार्गासाठी 14666 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

या प्रकल्पाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने ठेवले आहे. नागपूर सहित संपूर्ण विदर्भाच्या विकासाला हा रस्ता मोठा हातभार लावणार आहे. सध्या स्थितीला नागपूर ते विजयवाडा हे अंतर पार करण्यासाठी 13 ते 14 तासांचा वेळ लागतो मात्र हा महामार्ग जेव्हा बांधून तयार होईल तेव्हा हा वेळ पाच ते सहा तासांवर येणार आहे.

म्हणजेच प्रवाशांचा आठ ते नऊ तासांचा वेळ या ठिकाणी वाचण्यास मदत होणार आहे. यामुळे दळणवळण व्यवस्था सुधारणार आणि कृषी, पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्राला यांचा मोठा फायदा होणारच असा दावा केला जात आहे.

Leave a Comment