मोठी बातमी ! गुगलमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; पगार मिळणार महिन्याला 5 लाख, कोण राहणार पात्र, अर्ज कुठे करणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Job Alert : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः आयटी क्षेत्रात म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे.

कारण की आयटी क्षेत्रातील आघाडीच्या गुगल कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. खरंतर अलीकडे अनेक तरुण आयटी क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा उराशी बाळगून आहेत.

दरम्यान अशा साऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. गुगलमध्ये एका पदासाठी भरती निघाली आहे. गुगलने यासाठी नुकतीच जाहिरात काढली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून google ने अर्ज देखील मागवले आहेत.

त्यामुळे जर तुम्हीही गुगलमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर हा तुमच्यासाठी एक मोठा गोल्डन चान्स राहणार आहे. दरम्यान आज आपण गुगल मध्ये निघालेल्या या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी निघाली भरती

गुगलने बेंगलोर येथील कार्यालयासाठी प्रॉडक्ट मॅनेजर या पदासाठी ही भरती काढली आहे. या पदभरती अंतर्गत गुगल मॅप्स या गुगलच्या महत्वाकांशी प्रोडक्टसाठी प्रॉडक्ट मॅनेजरचे पद भरले जाणार आहे. या पदभरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना बेंगलोर मध्ये काम करावे लागणार आहे.

पदासाठी आवश्यक पात्रता

या पदासाठी बीसीएस पदवीधारक किंवा तत्सम पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. सदर उमेदवारास सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच प्रॉडक्ट मॅनेजमेंट मध्ये किमान दहा वर्षाचा अनुभव सदर उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

हे Skills असल्यास प्राधान्य 

डेटा अ‍ॅनालिसिस, उत्तम लेखी आणि मौखिक संवाद कौशल्य, गुगल मॅप्सवर रिव्ह्यू, फोटो, एडिटिंग यांसारख्या योगदानाची आवड असणे देखील आवश्यक आहे.

किती वेतन मिळणार

या भरती अंतर्गत प्रॉडक्ट मॅनेजर या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक 62 लाख रुपयांचा पगार मिळू शकतो अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच महिन्याला पाच लाख रुपयांपर्यंतचा पगार उमेदवाराला मिळणार आहे.

अर्ज कुठं करावा लागणार ?

गुगलमध्ये निघालेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. गुगलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी अर्ज सादर करता येणार आहे.   

Leave a Comment