महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार! कोणत्या जिल्ह्यात बरसणार ? हवामान विभागाचा नवीन अंदाज काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे.

कधी कडक ऊन, कधी अवकाळी पाऊस तर कधी गुलाबी थंडी यामुळे महाराष्ट्रात सध्या समिश्र वातावरणाची अनुभूती येत आहे. यामुळे स्वेटर घालावे की रेनकोट घालावे हा प्रश्न आहे.

पण महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची तीव्रता कमी झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता विरला आहे आणि हेच कारण आहे की, आता राज्यातून अवकाळी पावसाची रिपरिप काहीशी कमी झाली आहे.

मात्र अजूनही राज्यातील काही भागात ढगाळ हवामान कायम आहे. यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार की काय असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

अशातच आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हवामाना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.

मात्र, त्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज आहे. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात चांगली कडाक्याची थंडी पडेल असे सांगितले जात आहे. या थंडीचा राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.

ज्या भागात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे तेथील पिकांसाठी ही थंडी फायदेशीर राहील आणि पिकाच्या वाढीत मदत करेल असे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केले आहे. तत्पूर्वी मात्र महाराष्ट्रासहित देशातील काही भागात अवकाळी पाऊस पडणार आहे.

कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू, केरळमध्ये आणि दक्षिण भारतातील काही भागात पुढील 24 तासात पाऊस पडेल असा अंदाज आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागात हवामान ढगाळ राहणार आहे.

यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह कोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

तर, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सऱ्याही बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान कमी होणार आणि थंडीचा जोर वाढेल अस सांगितलं जात आहे.

Leave a Comment