सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! आता सरकार घरभाडे भत्त्यात करणार एवढी वाढ, केव्हा घेणार निर्णय ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee HRA Hike : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकताच नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डीएमध्ये 4% वाढ करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२% वरून ४६% एवढा करण्यात आला आहे. केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने देखील रेल्वे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा केला आहे.

विशेष म्हणजे महागाई भत्त्यात करण्यात आलेली ही वाढ जुलै 2023 पासून लागू करण्यात आली आहे. याचा रोखीने लाभ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळाली आहे.

जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम त्यांना मिळाली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रशासन आणखी एक भेट देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच घर भाडेभत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

पण यासाठी कर्मचाऱ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए केव्हा वाढू शकतो याबाबत जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. मीडिया रिपोर्ट नुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए ज्यावेळी 50% क्रॉस करेल त्यावेळी एचआरए सुधारित केला जाईल.

म्हणजेच ज्यावेळी महागाई भत्ता 50 टक्क्यांपेक्षा अधिक होईल त्यावेळी घर भाडे भत्ता सुधारणा करण्याचे प्रावधान आहे. सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता मिळत आहे. अशी आशा आहे की जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता 50% एवढा होईल.

यामुळे घर भाडे भत्ता देखील जानेवारी 2024 नंतर वाढवला जाऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. तथापि याबाबत शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, महागाई भत्ता 50% झाल्यानंतर केव्हाही एच आर ए वाढवला जाऊ शकतो अशी माहिती जाणकार लोकांनी यावेळी दिली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता शहरानुसार ठरविण्यात आला आहे. एक्स, वाय आणि झेड अशा कॅटेगिरीनुसार सध्या स्थितीला महागाई भत्ता दिला जात आहे. एक्स कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या 27% एवढा HRA मिळत आहे.

वाय कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18% एवढा एचआरए मिळत आहे. तसेच झेड कॅटेगिरी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या 9% एवढा एचआरए दिला जात आहे. पण आता लवकरच यामध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 30 टक्के एवढा केला जाईल, वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 20 टक्के एवढा केला जाईल आणि झेड श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दहा टक्के एवढा केला जाईल. 

Leave a Comment