मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी सरसकट 6 हजाराचा बोनस जाहीर, मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Employee Diwali Bonus 2023 : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारां निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. खरंतर राज्य शासनाच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो.

याच पार्श्वभूमीवर यंदा देखील दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. यंदा ST कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. खरंतर, सध्या सर्वत्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे वातावरण आहे.

अशा या आनंदाच्या आणि प्रसन्न वातावरणात राज्यातील एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

15 हजाराची होती मागणी

यावर्षी दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये दिवाळी बोनस दिला पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. यासाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता.

मात्र शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण केलेली नाही. शिंदे सरकारने यंदा दिवाळी बोनस म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये दिले जातील असे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये एवढा दिवाळी बोनस मिळाला होता.

म्हणजेच यावर्षी बोनसच्या रकमेत एक हजार रुपयाची वाढ करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. साहजिकच, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार दिवाळी बोनस मिळालेला नाही. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार रुपयाची वाढ करण्यात आली असल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

ST कर्मचाऱ्यांमध्ये वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतलेल्या बोनसच्या या निर्णयामुळे समाधान पाहायला मिळत आहे. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या नोकरदारांची दिवाळी यंदा काही प्रमाणात गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

Leave a Comment