Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. खरे तर जुलै 2023 पासून केंद्र शासनाने चार टक्के महागाई भत्ता वाढवला आहे. जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता किती टक्के वाढणार हा मोठा सवाल आहे. वास्तविक, महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवला जातो.
वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जातो. लेबर ब्युरोच्या माध्यमातून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीवरून महागाई भत्ता ठरत असतो.
दरम्यान जुलै 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतची संपूर्ण एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरमध्ये निर्देशांक 0.3 अंकांनी घसरून 138.8 अंकांवर आला.
परंतु, यामुळे महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडलेला नाही. अपेक्षेप्रमाणे, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला.
आता महागाई भत्ता 50.28 टक्के झाला आहे. परंतु, दशांश ०.५० च्या खाली आहे, त्यामुळे केवळ ५० टक्केच महागाई भत्ता पकडला जाणार आहे.
म्हणजेच सध्याच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे जवळपास अंतिम झाले आहे. मात्र महागाई भत्ता वाढीचा निर्णय केव्हा होणार हा मोठा सवाल आहे.
केव्हा होणार निर्णय
खरे तर यंदा निवडणूकां होणार आहे. निवडणुकांचे वर्ष असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न निश्चितच सरकारकडून होणार आहे.
यामुळे वेळेवर महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. सर्वसाधारणपणे होळीच्या सणानिमित्ताने सरकारकडून पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जातो.
होळीच्या सणानिमित्ताने म्हणजेच मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जातो आणि यावर्षी देखील जानेवारी 2024 पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय मार्च महिन्यातच होईल असा दावा केला जात आहे. निश्चितच जर मार्च 2024 मध्ये याबाबतचा निर्णय घेतला गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.