Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येणारा ऑगस्ट महिना हा खूपच लाभदायक सिद्ध होणार आहे. कारण की या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन-दोन गिफ्ट शासनाकडून मिळणार आहेत.
एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मधून प्राप्त झालेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशभरातील एक करोड 75 लाखाच्या आसपास संख्या असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
AICPI च्या आकडेवारीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्के वाढ होण्याची आशा आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा आहे. आता यात चार टक्के वाढ होणार असा दावा केला जात आहे.
म्हणजेच हा महागाई भत्ता 46% एवढा बनणार आहे. खरंतर ही घोषणा या चालू महिन्यातच होणार होती. मात्र जुलै महिन्यात याची घोषणा काही कारणास्तव होऊ शकली नाही. परंतु आता ऑगस्ट महिन्यात याची घोषणा होणार असा दावा केला जात आहे. निश्चितच महागाई भत्ता म्हणजेच डीए आणखी चार टक्के वाढला तर याचा फायदा देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारक तसेच कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
याव्यतिरिक्त केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. ती म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे. घर भाडे भत्ता म्हणजेच हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) देखील वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने जुलै 2021 मध्ये HRA म्हणजे घरभाडे भत्ता वाढवला होता. त्यानंतर या भत्त्यात वाढ झाली नाही.
यामुळे आता येत्या महिन्यात या भत्त्यात वाढ केली जाऊ शकते. याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच अधिकारीक माहिती मिळालेली नाही मात्र या भत्यात वाढ होणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. या HRA मध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच, हे दोन निर्णय केंद्र शासनाने घेतले तर यामुळे देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे त्यांचे आर्थिक हितच जोपासले जाणार आहे.