पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा राहणार ? पुणेकरांना काय-काय मिळणार ? पंतप्रधान कार्यालयाने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Modi Pune Visit : जर तुम्हीही पुणेकर असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची राहणार आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या काही तासात मोदी पुणे शहरात दाखल होणार आहेत.

उद्या अर्थातच एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आयोजित आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांच्या माध्यमातून सर्व आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान याच पुणे दौऱ्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यात पंतप्रधान कार्यालयाने पीएम मोदी यांचा दौरा कसा राहणार याची ए टू झेड माहिती दिली आहे. दरम्यान आज आपण उद्या म्हणजेच मंगळवारी पीएम मोदी पुणेकरांना काय-काय गिफ्ट देणार आहेत याबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंतप्रधान कार्यालयाने काल रविवारी पीएम मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात पीएम मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. तसेच पीएमओने सांगितले की, पीएम मोदी पुणे शहरातील विस्तारित मेट्रो मार्गांना देखील हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

खरतर फुगेवाडी स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन पर्यंतच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गांची पाहणी देखील सुरक्षा आयुक्तांकडून पूर्ण करण्यात आली आहे. सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावर रेल्वे चालवण्यास परवानगीही दिली आहे. दरम्यान आता या विस्तारित मेट्रो मार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

वास्तविक, 2016 मध्ये पंतप्रधानांनी पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. यानंतर गेल्यावर्षी अर्थातच 2022 मध्ये मोदी यांनी पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक या दरम्यानच्या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवला आहे. आता पीएम मोदीच पुणे शहरातील मेट्रोच्या विस्तारित मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

या नवीन मार्गामुळे पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्टेशन यासारखी महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार आहेत. निश्चितच या विस्तारित मेट्रो मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील दळणवळण व्यवस्था अधिकच मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

या प्रकल्पांनाही दाखवणार हिरवा झेंडा
यादरम्यान पंतप्रधान मोदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला हा प्रकल्प वीज निर्मितीसाठी दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरणार आहे.

तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत PCMC ने बांधलेल्या 1,280 हून अधिक घरांना पंतप्रधान लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत. पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या 2,650 PMAY घरांनाही ते लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत. याशिवाय, PCMC द्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1,190 PMAY घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणार्‍या 6,400 हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधान मोदी उद्या करणार आहेत.

Leave a Comment