ऑगस्टमध्ये किती दिवस पाऊस पडणार अन किती दिवस पाऊस विश्रांती घेणार ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh August Weather News : जुलै महिन्यात राज्यातील बहुतांशी भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांच्या जास्तीच्या पावसाने जमिनी खरडून निघाल्या आहेत.

जास्तीच्या पावसाने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. मात्र असे असेल तरी राज्यातील काही भागात अजूनही समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. यात प्रामुख्याने नासिक आणि अहमदनगर जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. म्हणून येथील शेतकरी चिंतेत आहेत.

एकीकडे जास्तीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे काही भागात अपेक्षित असा पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नासिक, अहमदनगर, सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. याव्यतिरिक्त मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही.

अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात पाऊस विश्रांती घेणार असा हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे. यामुळे ज्या भागात अजून चांगला पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे.

मात्र, ज्या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती तेथील सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी ऑगस्ट महिन्यातील हवामानाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. चार ऑगस्ट नंतर मात्र राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे.

4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. या 9-10 दिवसांच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेणार आहे. मात्र 14 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. नासिक आणि अहमदनगर जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही त्या भागात 13 ऑगस्ट नंतर चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक, अहमदनगर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षी दुष्काळ पडणार नाही, राज्यातील सर्व महत्त्वाची धरणे शंभर टक्के क्षमतेने भरतील असं देखील पंजाब रावांनी यावेळी सांगितल आहे.

Leave a Comment