Government Employee News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी सरकारी नोकरदार म्हणून कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
खरतर केंद्रीय अधिकाऱ्यांसाठी शासन विविध सोई-सुविधा पुरवते. अधिकाऱ्यांना वेतनासोबतच अनेक लाभ दिले जातात. अशातच आता शासन केंद्रातील अधिकाऱ्यांना तब्बल एक लाख तीस हजार रुपये पर्यंतच्या किमतीचे मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर तत्सम उपकरणे देऊ करणार आहे.
केंद्र शासनाकडून मिळणारी ही लाखो रुपये किमतीची उपकरणे या संबंधित अधिकाऱ्यांना चार वर्षानंतर वैयक्तिक वापरासाठीही वापरता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
निश्चितचं केंद्रातील अधिकाऱ्यांसाठी ही एक गुड न्युज राहणार आहे. दरम्यान आज आपण कोणत्या अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या अधिकाऱ्यांना मिळणार लाभ
हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रातील काही अधिकार्यांना कार्यालयीन कामासाठी मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, नोटबुक, नोटपॅड, अल्ट्रा बुक किंवा इतर तत्सम उपकरण सोबत बाळगता येणार आहे. ही उपकरणे केंद्रातील अधिकाऱ्यांना केंद्र शासनाकडून दिली जाणार आहेत.
यासाठी पात्र अधिकाऱ्यांना तब्बल एक लाख तीस हजार रुपये किमतीपर्यंतची उपकरणे दिली जाणार आहेत. केंद्र सरकारचे उपसचिव आणि त्यावरील स्तरावरील सर्व अधिकारी या उपकरणांसाठी पात्र राहणार आहेत.
परंतु जर मंत्रालयातील, विभागातील अधिकाऱ्यांना याआधीच एखाद्या उपकरणाचा लाभ मिळालेला असेल तर अशा अधिकाऱ्याला आगामी चार वर्षांसाठी कोणतेच नवीन उपकरण दिले जाणार नाही. केंद्रीय वित्त मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक तत्वेही नुकतेच जाहीर केले आहेत.