Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर, गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र नवीन वेतन आयोगाबाबत चर्चा रंगल्या आहेत.
सध्याच्या वेतन आयोगात सुधारणा करून नवीन वेतन आयोग लागू होणार अशा बातम्या सध्या वृत्तपत्रांमध्ये चर्चेत आल्या आहेत. वास्तविक, 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.
तेव्हापासून 7th Pay Commission नुसार कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात आहे. मात्र आता सध्या अस्तित्वात असलेल्या वेतन आयोगात सुधारणा होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, आज आपण पुढील आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना केव्हा लागू होऊ शकतो, नवीन वेतन आयोग केव्हा लागू होतो, आठवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार, याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नवीन वेतन आयोग केव्हा लागू होतो?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वेतन आयोग लागू झाल्यानंतर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. म्हणजेच 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला आहे आता तेथून दहा वर्षानंतर म्हणजेच 2026 च्या सुमारास आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.
मात्र हा नवीन वेतन आयोग लागू करण्यापूर्वी नवीन वेतन आयोगाची अर्थातच आठवा वेतन आयोगाची स्थापना केली जाणार आहे. यासाठी एका समितीची स्थापना होणार आहे. समितीची स्थापना पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
खरंतर, पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका राहणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना नाराज करण्याच्या मूडमध्ये नाही. अशा परिस्थितीत नवीन वेतन आयोगासाठी आवश्यक असलेल्या समितीची स्थापना पुढल्या वर्षी पर्यंत होईल असा दावा काही तज्ञ लोकांनी देखील केला आहे.
वास्तविक, सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टरने वेतन दिल जात आहे. मात्र आता आठवा वेतन आयोग अंतर्गत या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा होणार आहे. नवीन वेतन आयोगानुसार 3.58 पट फिटमेंट फॅक्टरनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे.
किती पगार वाढणार ?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26 हजार रुपये एवढे होणार आहे.
तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 15,000 वरून 21 हजार रुपये एवढे किमान मूळ वेतन होणार आहे. निश्चितच, बेसिक सॅलरी मध्ये वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी वाढ नमूद केली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.