पंजाब डख हवामान अंदाज ! जुलै महिन्याचा शेवट होणार गोड, ‘या’ तारखांना महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh July Month Weather Update : जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा आज संपला. खरंतर पावसाळ्याची सुरुवात जून महिन्यापासूनच होते आणि सप्टेंबर पर्यंत पावसाळा सुरू राहतो. पण यंदा पावसाळ्याची सुरुवात खूपच कमकुवत झाली आहे.

पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जूनमध्ये महाराष्ट्रात पावसाने मोठा खंड पाडला आहे. जून महिन्याचे सुरुवातीचे 20 दिवस राज्यात पावसाने दडी मारली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.

यानंतर जुलै महिन्यात पावसाची तीव्रता आणखी वाढली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय कोकणात आणि घाटमाथ्यावर देखील या कालावधीमध्ये चांगला पाऊस झाला.

मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिली. आठ जुलैपासून राज्यातून पावसाचा जोर कमी झाला. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी होत्या त्यांची धडधड वाढली आणि ज्यांच्या पेरण्या झाल्या होत्या त्यांना देखील भीती वाटू लागली होती.

अशातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु जोरदार पावसाची अजूनही शेतकऱ्यांना आतुरता लागून आहे. राज्यातील बहुतांशी भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, मात्र खरीप हंगामातील पिकांसाठी जोरदार पावसाची नितांत गरज आहे.

अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात 20 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.

20 ते 26 जुलै या कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र मधील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. विशेषता विदर्भात पावसाची तीव्रता या कालावधीमध्ये अधिक राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल आहे. खरंतर 12 ते 15 जुलै दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मात्र या कालावधीमध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही असे डख यांनी स्पष्ट केले होते. यानुसार, या कालावधीत राज्यात पाऊस पडला मात्र सर्वदूर पाऊस पडला नाही तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. यामुळे आता पंजाब डख यांचा पुढील हवामान अंदाज काय सांगतो ? याबाबत जाणून घेण्याची विशेष उत्सुकता शेतकऱ्यांना लागून होती.

अशा परिस्थितीत, डख यांनी आता 20 जुलैपासून ते 26 जुलै पर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. निश्चितच, पंजाब डख यांचा हा अंदाज खरा ठरला तर खरीप हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळणार असून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समाधान लाभणार आहे.

Leave a Comment