नासिक-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्गाचे घोडे नेमके अडले कुठे ? काम सुरु होणार की नाही ? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik-Pune Railway : नाशिक हे वेगाने विकसित होत असलेले आणि नासिक, पुणे, मुंबई या ट्रँगल मधील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ देखील आहे. तसेच पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून शिक्षणाचे माहेरघर म्हणून आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात ख्याती प्राप्त आहे.

नासिक ते पुणे या दोन शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त या दोन शहरा दरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी उल्लेखनीय आहे. मात्र असे असले तरी सध्या या दोन शहरादरम्यान प्रवास करायचा असेल तर रस्ते मार्गानेच प्रवास करावा लागतो.

या दोन शहरांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही. राज्यातील दोन महत्त्वाची शहरे असतानाही या शहरादरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी विकसित झालेली नसल्याने प्रवाशांना खूपच अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे या शहरादरम्यान रेल्वे मार्ग विकसित व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

अशा परिस्थितीत या दोन शहराला लोहमार्गाने कनेक्ट करण्यासाठी नवीन रेल्वेमार्ग विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नासिक-अहमदनगर-पुणे असा रेल्वे मार्ग घोषित करण्यात आला आहे. मात्र या रेल्वे मार्गाची घोषणा झाली खरी पण या मार्गाचे काम पुढे सरकलेले नाही.

यामुळे हा रेल्वे मार्ग होतो की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. अशातच या मार्गासंदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. राज्याचे नवोदित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या मार्गाचे काम नेमके कुठे अडले आहे, हा मार्ग नेमका केव्हा सुरू होऊ शकतो याबाबत त्यांनी सविस्तर अशी माहिती नाशिक येथे पत्रकारांना बोलतांना दिली आहे.

काम कुठं अडलंय ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, काल त्यांनी महारेलकडून या प्रकल्पाबाबत सर्व आवश्यक माहिती समजून घेतली आहे. महारेलचे अधिकारी जयस्वाल यांच्याकडून त्यांनी या प्रकल्पाबाबत आवश्यक माहिती जाणून घेतली आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पाचे काम हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयात थांबलेले आहे. रेल्वे मंत्रालयाची या प्रकल्पाबाबत काही मत आहेत, यामुळे हा प्रकल्प केंद्रीय रेल्वे मंत्रालयात अडकून पडला आहे. पण आता अजित पवार या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करणार आहेत.

पवार यांनी असे सांगितले आहे की, हा प्रकल्प महारेल या स्वातंत्र्य कंपनीकडून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण रेल्वे मंत्र्यांनी हा प्रकल्प त्यांच्याकडे मागितला आहे. खरंतर हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे नासिक, अहमदनगर आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी हा प्रकल्प कोणी करावा याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मग या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात जमीन अधिग्रहणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  

Leave a Comment