शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अहमदनगरच्या ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला विक्रमी दर, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Price In Ahmednagar : गेल्या अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा तेजीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील तेजी पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याला मात्र चार ते पाच रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता.

फेब्रुवारी ते मार्च हा कालावधी तर अतिशय बिकट होता या कालावधीत कांदा मात्र दोन ते तीन रुपये किलो या दरात विकावा लागला. पण आता या चालू जुलै महिन्यात बाजारातील आधीची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बाजारात आता चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असून कांद्याला चांगला समाधानकारक भाव देखील मिळू लागला आहे.

यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. कांद्यासोबतच भाजीपाला दरात देखील मोठी तेजी आली आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, जुलैचा पहिला पंधरवडा उलटला तरी देखील महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही.

पुरेसा पाऊस नसल्याने भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले असून याचा परिणाम म्हणून दरात वाढ होत आहे. सध्या राज्यातील सर्वच बाजारात कांदा, टोमॅटो आले, हिरवी मिरची, लसूण, कारली, गवार, भेंडी, दोडका, शेवगा, तेजीत आले आहे. विशेषता टोमॅटोला कधीही मिळाला नव्हता एवढा विक्रमी दर मिळत आहे.

शुक्रवारी अर्थातच काल 14 जुलै रोजी झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला विक्रमी दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राहता एपीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या लिलावात टोमॅटोला दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.

सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने भाजीपाला पिकावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. पावसाअभावी टोमॅटोचे उत्पादन घटले आहे. परिणामी टोमॅटोला विक्रमी दर मिळत आहे. यासोबतच कालच्या लिलावात राहता एपीएमसीमध्ये कांद्याला देखील चांगला दर मिळाला आहे.

कांद्याला काय भाव मिळाला?

राहता एपीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या लिलावात कांद्याला विक्रमी दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. काल या बाजारात 21,458 कांदा गोणींची आवक झाली. यात प्रतवारीनुसार एक नंबर कांद्याला 1 हजार 500 ते 2 हजार रुपये भाव मिळाला.

तसेच नंबर 2 कांद्याला 850 ते 1450 रुपये, तीन नंबर कांद्याला 300 ते 800 रुपये, गोल्टी कांद्याला 850 ते 1 हजार 50 रुपये आणि जोड कांदा म्हणजे बेल्या कांद्याला 100 ते 300 रुपयांप्रमाणे भाव मिळाला आहे. निश्चितच टोमॅटो, कांदा आणि इतर भाजीपाल्याला मिळत असलेल्या समाधानकारक दरामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतीमालाला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना या विक्रमी बाजारभावामुळे पुन्हा एकदा उभारी मिळणार असे चित्र आता तयार होऊ लागले आहे.

यामुळे निश्चितच सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे मात्र गेली कित्येक दिवस शेतकऱ्यांना शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे, यामुळे सध्याचा शेतमालाचा बाजार भाव हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो असे मत व्यक्त होत आहे. 

Leave a Comment