Government Employee News : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्र उत्सव 24 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर पुढल्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. एकंदरीत आगामी काही दिवस संपूर्ण देशात सणांची रेलचेल राहणार आहे. यामुळे लोकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान या उत्साही वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिवाळीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 9000 रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ मिळणार आहे. कारण की केंद्र शासन महागाई भत्ता वाढ लागू करणार आहे. तसेच महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
किती वाढणार DA
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजे DA चार टक्के एवढा वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी चार टक्के वाढ होईल असा मोठा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे.
याचाच अर्थ डीए हा 46% होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होईल. ही वाढ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जें वेतन नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे.
पगार किती वाढणार?
जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 56 हजार 900 रुपये असेल तर अशा कर्मचाऱ्याला डीए 46% झाल्यानंतर 26,174 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 23898 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. म्हणजेच डीए चार टक्के वाढ झाल्यानंतर पगारात दरमहा 2,276 रुपयांची वाढ होणार आहे.
महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार
खरंतर ही महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू होईल. म्हणजेच जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्याच्या काळातील महागाई भत्ता थकबाकी देखील संबंधित नोकरदार वर्गाला मिळणार आहे. याचाच अर्थ 56 हजार 900 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला चार महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी म्हणून 9,104 रुपये दिले जातील.