राज्यात नवीन हंगामातील कापूस खरेदी सुरू ! मुहूर्ताच्या कापसाला मिळाला एवढा भाव, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकांची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे.

विशेष म्हणजे सणासुदीचा हंगाम सुरू असल्याने हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. काही भागातील बाजारात कापसाची खरेदी सुरू झाली आहे तर काही ठिकाणी खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खेडा खरेदी करत आहेत.

मात्र सध्या सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान कापूस पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानदेशमधील नंदुरबार जिल्ह्यातही कापसाची खरेदी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर काल अर्थातच सोमवारी, 16 ऑक्टोबर 2023 रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय भाव मिळतोय

हाती आलेल्या माहितीनुसार, काल नंदुरबार जिल्ह्यातील या खरेदी केंद्रावर 200 क्विंटल नवीन कापसाची आवक झाली होती. यावेळी मुहूर्ताच्या कापसाला 7290 प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल भाव मिळाला आहे.

खरंतर गेल्या वर्षी मुहूर्ताच्या कापसाला खानदेश मध्ये अकरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला होता. मराठवाड्यात देखील मौताच्या कापसाला 11 ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता.

यावर्षी मात्र कापसाला खूपच कमी दर मिळत आहे. मुहूर्तावरच कापसाला नगण्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. काल पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोळा वाहनांमधून कापसाची 200 क्विंटल आवक झाली आणि मालाला 6700 ते 7290 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे.

कापूस खरेदी सुरू झाली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी थोडे नाराजही आहेत. 

Leave a Comment