शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ रब्बी पिकाच्या बियाण्यासाठी मिळणार तब्बल 50% अनुदान, अर्ज झालेत सुरु, कोणती कागदपत्रे लागणार? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rabbi Season Crop Seed Subsidy : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी एक मोठी कामाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसात रब्बी हंगाम 2023 सुरू होणार आहे. यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.

शेतकरी बांधव खरीप हंगामांतील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून रब्बी पिकांसाठी जमिन तयार करत आहेत. सध्या राज्यातील विविध भागात खरीपातील सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

ते म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाण्यांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. रब्बी बियाण्यांसाठी तब्बल पन्नास टक्के अनुदान मिळणार असून यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत बियाण्यांसाठी हे अनुदान दिले जाणार आहे. 2023-24 च्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा ज्वारी यांसारख्या बियाण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

यामुळे जर तुम्हीही रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा ज्वारी यांसारख्या पिकांची पेरणी करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन अनुदानित बियाणे प्राप्त करू शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

दरम्यान आज आपण या योजनेअंतर्गत बियाण्याच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसा अर्ज करावा लागेल, किती अनुदान शेतकऱ्यांना मिळेल तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार

रब्बी हंगाम 2023-24 साठी गहू, हरभरा, ज्वारीचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे. बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 50 टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे.

म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत निम्म्या किमतीत बियाणे उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी महाडीबीटी चे अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. किंवा शेतकरी बांधव आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र अर्थातच सीएससी सेंटरवर जाऊन देखील या योजनेअंतर्गत बियाणे अनुदानासाठी अर्ज करू शकतात.

कोण-कोणती कागदपत्रे लागणार ?

बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ अ उतारा, बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Leave a Comment