व्यवसाय असावा तर असा ! गुंतवणूक फक्त 10 हजार आणि कमाई महिन्याकाठी 50 हजाराची, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Idea : आजची ही बातमी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर अनेक तरुणांकडून व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे निश्चित होत नसल्याची तक्रार समोर येत आहे. दरम्यान तरुणांची हीच तक्रार लक्षात घेऊन आज आम्ही तरुणांनी कमी गुंतवणुकीत कोणते व्यवसाय सुरू केले पाहिजे याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांचा माईंड सेट बदलला आहे. आता नोकरी ऐवजी स्वतःचा व्यवसायात बरा असे मत तरुणांकडून व्यक्त होत आहे. परंतु गुंतवणूक अभावी अनेकांना व्यवसाय सुरू करता येत नाही. पण आपल्या देशात असे अनेक व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात ज्यामध्ये खूपच कमी गुंतवणुकीची गरज भासते.

अगदी दहा हजार रुपयांच्या किमान गुंतवणुकीत देखील आपल्या देशात व्यवसाय चालू केला जाऊ शकतो. कदाचित तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही मात्र असे काही व्यवसाय आहेत जे केवळ दहा हजार रुपयात सुरू होऊ शकतात. आज आपण याच व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत.

10 हजार रुपयात सुरू करता येणारे व्यवसाय कोणते?

लोणचं बनवण्याचा व्यवसाय : खरंतर हा व्यवसाय काही नवीन नाही. पिकल मेकिंग बिझनेस म्हणजेच लोणचं बनवण्याचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जात आहे. या व्यवसायात तुम्हाला अनेक ब्रँड पाहायला मिळतील. परंतु आजही मार्केटमध्ये घरगुती लोणच्याची मोठी मागणी आहे. यामुळे तुम्ही तुमच्या परिसरात घरगुती लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही बनवलेले लोणचे तुम्ही तुमच्या परिसरात सेल करून चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातूनच चालू करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेच गाळा किंवा दुकान भाड्याने घ्यावे लागणार नाही. तुमचा व्यवसाय मोठा झाला की मग तुम्ही गाळा किंवा दुकान भाड्याने घेऊ शकता तसेच तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन देखील ओपन करू शकता.

टिफिन सर्विस : जर तुम्ही शहरात राहत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी सोने का अंडा देने वाली मुर्गी सारखा राहणार आहे. कारण की शहरात टिफिनची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मेसचा हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शहरात नोकरी धंद्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅचलर मुलं स्थायिक होतात. तसेच एका परिवारातून एकापेक्षा अधिक सदस्य कामाला असतात. यामुळे टिफिन ची मागणी शहरात मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत तुम्ही या संधीचे सोने करू शकता आणि टिफिन सर्विस बिजनेस सुरु करून चांगली कमाई करू शकता. यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग मात्र योग्य पद्धतीने करावी लागणार आहे. तसेच तुम्ही जर घरगुती चवीचे जेवण तुमच्या ग्राहकांना दिले तर तुमचा व्यवसाय हा लवकरच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होण्याची शक्यता देखील आहे.

फोटोग्राफी : अलीकडे मोबाईल फोन प्रत्येकाकडे आहेत. यामुळे फोटोग्राफीचा व्यवसाय थोडा मंदीत आहे. परंतु काळानुरूप लोकांचे छंदही बदलत आहेत. आता लोकांना मोबाईल ऐवजी DSLR चे फोटो अधिक आवडतात. छोट्या मोठ्या फंक्शन पासून ते लग्न कार्यापर्यंत सर्वत्र फोटोग्राफीची गरज असते. यामुळे तुम्ही हा व्यवसाय सूरु करून चांगले उत्पन्न या ठिकाणी कमवू शकणार आहात. यासाठी मात्र तुमच्याकडे फोटोग्राफीचे स्किल असणे आवश्यक आहे. शिवाय तुम्हाला फोटो एडिट करता येणे आवश्यक आहे. जर तुम्ही चांगला फोटो काढत असाल आणि तो फोटो चांगला एडिट करत असाल तर तुमच्या व्यवसायाला मोठ होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला मात्र एक लाखापर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. जर तुमच्याकडे एवढी अमाऊंट नसेल तर तुम्ही EMI वर DSLR घेऊ शकता आणि अवघ्या काही हजाराची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता.

योगा क्लासेस : अलीकडे योगा शिकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. योगा मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे वारंवार सिद्ध झाले असल्याने आता प्रत्येक जण योगा टीचरकडे जाऊन योगा शिकत आहे. यामुळे जर तुम्हीही योगा करत असाल, तुम्हाला योगाचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही योगा टीचर बणून तुमचे स्वतःचे योगा क्लासेस सुरू करू शकता. तुम्ही इतरांना योगा शिकवून चांगले उत्पन्न या ठिकाणी कमवू शकणार आहात. 

Leave a Comment