पुढील 2 दिवस ‘या’ राज्यात धो-धो पाऊस बरसणार ! महाराष्ट्रात कस राहणार हवामान ? वाचा हवामान विभागाचा नवीन अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : मान्सून 2023 आता अंतिम टप्प्यात आला आहे. देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी परतला आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमधून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्रासह देशातील काही भागांमधून अजूनही मान्सून पूर्णपणे माघारी फिरलेला नाही.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस देशातील काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून विशेषता जेव्हापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे तेव्हापासून देशातील विविध राज्यांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे.

आपल्या महाराष्ट्रातही कमाल तापमान मोठे वाढले आहे. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचे चटक्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील 48 तासात देशातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार पुढील 48 तास तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केरळ राज्यातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी झाला आहे. तिरुवअनंतपुरमसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केरळमधील काही विभागात तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे केरळमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. आज आणि उद्या देशातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीने वर्तवला असून हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हिमवृष्टी होईल असा अंदाज आहे.

एकंदरीत देशातील काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात रिमझिम स्वरूपाचाच पाऊस पडणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment