Government Employee Payment Hike : देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. शिवाय काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत.
अशा परिस्थितीत देशभरातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता आता देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला जाणार आहे, पगारात तब्बल आठ हजार रुपये प्रति महिना पर्यंतची वाढ होणार आहे.
वास्तविक, जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एआयसीपीआयच्या जून महिन्याच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या 42 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजे DA मिळत आहे.
आता यात चार टक्के वाढ होणे निश्चित झाले आहे. अर्थातच, महागाई भत्ता आता 46% एवढा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता वाढ मिळणार हे निश्चित झाले असले तरी देखील याची घोषणा अजून झालेली नाही.
याची घोषणा या चालू ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. तसेच हा लाभ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, महागाई भत्ता वाढीचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जाणार आहे. अर्थातच याचा रोख लाभ सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.
म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंतची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. दरम्यान आज आपण महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पगारात किती वाढ होणार?
खरंतर, महागाई भत्ता हा मूळ पगारावर आधारित असतो. सध्या 31 हजार 550 रुपये मूळ पगार असलेल्या लोकांना 42% प्रमाणे 13251 रुपये प्रति महिना डीए मिळत आहे. जर महागाई भत्ता 46 टक्के झाला तर 31 हजार 550 बेसिक सॅलरी असलेल्यांना 14513 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच पगारात 1262 रुपये एवढी वाढ नमूद केली जाणार आहे.