केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी देणार 50 लाखांपर्यंतचे अनुदान ! कोणाला मिळणार लाभ ? 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Farmer Scheme : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

शेतीला पूरक व्यवसाय असल्याने या व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. सुरुवातीला हा व्यवसाय शेतीला दुय्यम म्हणून केला जात असे. पण अलीकडे या व्यवसायाची व्याप्ती वाढली असून आता व्यावसायिक पशुपालन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वधारत आहे.

यामुळे आता हा व्यवसाय दुय्यम राहिला नसून एक प्रमुख व्यवसाय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मात्र या व्यवसायासाठी शेतकऱ्यांकडे अपेक्षित असे भांडवल नसते. यामुळे पशुपालकांना या व्यवसायातून अपेक्षित असे यश मिळवता येत नाही.

दरम्यान शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने 2021 मध्ये राष्ट्रीय पशुधन अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत पशुपालकांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान पुरवले जात आहे. दरम्यान या अभियानात नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित अभियानाला सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान असे नाव देण्यात आले आहे. तसेच या सुधारित अभियानात पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियान, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियान, नावीन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपअभियान इत्यादी बाबींचा समावेश देखील करण्यात आला आहे.

पशुपालकांना शेळीपालनासाठी मिळणार 50 लाखांचे अनुदान !

या सुधारित अभियानांतर्गत पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियानाच्या माध्यमातून देशातील पशु पालकांना शेळी- मेंढीपालन, कुक्कुटपालन, मूरघास निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनासाठी प्रत्येकी 50 टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यानुसार शेतकऱ्यांना 100 शेळ्यांसाठी कमाल 10 लाख, 200 शेळ्यांसाठी 20 लाख, 300 शेळ्यांसाठी 30 लाख, 400 शेळ्यांसाठी 40 लाख आणि 500 शेळ्यांसाठी 50 लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते. 

कुक्कुटपालन, वराहपालन आणि मुरघास निर्मितीसाठी देखील मिळणार अनुदान !

या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना कुक्कुटपालनासाठी कमाल 25 लाख, वराह म्हणजे डुक्कर पालनअंतर्गत 50 वराहासाठी 15 लाख आणि शंभर वराहसाठी 30 लाख, याशिवाय मुरघास निर्मिती आणि वैरण बियाणे प्रकल्पांसाठी तब्बल पन्नास लाखांपर्यंतचे अनुदान या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळू शकते.

निश्चितच केंद्राची ही योजना देशभरातील पशुपालकांना दिलासा देणारी आहे. या योजनेमुळे पशुपालकांना पशुपालन व्यवसायात चांगली प्रगती साधता येणे शक्य होणार आहे. व्यावसायिक स्तरावर पशुपालन हा व्यवसाय करून शेतकरी देखील या अभियानाचा लाभ घेऊन उद्योजक बनू शकतात असा आशावाद तज्ञ लोकांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. 

Leave a Comment